विश्लेषक आणि सहकारी वर्गाने बजावलेल्या कामगिरीसाठी ट्रेसविस्टाकडून बोनसची घोषणा

Share this Newz

The Newz Biz Team, Mumbai 

ट्रेसविस्टा हे कॉर्पोरेट, असेट मॅनेजर आणि उद्योजकांना सर्वोत्तम आऊटसोर्स साह्य पुरविणारे माध्यम असून त्यांनी प्रत्येक विश्लेषक आणि समतुल्य सहकाऱ्याला एकरकमी रुपये 50,000 बोनसची घोषणा केली. सध्याचा काळ हा मूल्यांकनाचा असून ज्यांनी 2020 महासाथीतही उत्तम काम बजावले त्यांच्याकरिता बोनसची घोषणा केली. त्याचप्रमाणे जुलै 2021 दरम्यान ट्रेसविस्टाच्या वतीने कंपनीत वेतनसंबंधी उजळणी करण्यात येणार असून प्रशिक्षण तसेच तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. सध्याच्या ~30%, सीएजीआरसह आगामी चार वर्षांत कर्मचारी क्षमता ~2,500 करण्याचा ट्रेसविस्टाचा अंदाज आहे.

ट्रेसविस्टाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक सुदीप मिश्रा म्हणाले की, “ट्रेसविस्टा ही कायमच कर्मचारी-केंद्री संघटना राहिली आहे. नेहमीच सुधारणा करण्याकडे आमचा कल असतो. महासाथी दरम्यान प्रत्येकाकरिता परिस्थिती आव्हानात्मक होती, मात्र तशा स्थितीत आमचा कर्मचारी वर्ग कार्यरत राहिला. हा बोनस म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे, त्यांचे आभार मानण्याचे साधन आहे. ट्रेसविस्टाचा परिणाम कायम विस्तृत आणि सखोल असावा हे आमचे उद्दिष्ट आहे. सर्वोत्तम होण्याची मनीषा आहे. आमच्या कंपनीत ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले, त्या सर्व कर्मचारी वर्गाला उत्तम संधी प्राप्त होण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत.”

ट्रेसविस्टाने मुंबई, पुणे आणि बंगळूरू येथील डिलिव्हरी सेंटरमध्ये 2020 मध्ये त्यांनी 300 कर्मचाऱ्यांची भरती केली. कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावात कर्मचारी वर्गाला मदत म्हणून केअरगिव्हर स्पेशल लिव्ह, कोव्हीड-पॉझिटीव्ह पेड लिव्ह आणि डब्ल्यूएफएच सेटअप रिएम्बर्समेंट कर्मचारी-स्नेही योजना राबविण्यात आल्या.


Share this Newz