The Newz Biz Team, PUNE
ओएसिस फर्टिलिटीच्यावतीने लैंगिक व प्रजनन आरोग्य दिनानिमित्त वीकॅनकन्सिव्ह या जनजागृती मोहिमेचे आणि पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या वंध्यत्वावरील उपायांसाठी आधार देणाऱ्या परिसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून वंध्यत्वाविषयी माहिती आणि या समस्येने ग्रासलेल्या जोडप्यांना आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन ओएसिस फर्टिलिटीचे सीओओ सुधाकर जाधव, वंध्यत्व उपचार तज्ज्ञ डाॅ. निलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना सुधाकर जाधव म्हणाले, वंध्यत्वाच्या आव्हानाला सामोरे जाणारी अनेक जोडपी आहेत आणि त्यावर उपाय व उपचार शोधण्यासाठी त्यांना आधार, मदतीची आणि योग्य सल्ल्याची गरज असते. वीकॅनकन्सिव्ह या संकल्पनेद्वारे वंध्यत्वाने बाधित जोडप्यांना माहिती व मदत मिळू शकणार आहे. या लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती परिसंस्थेद्वारे जगभरातील वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, आरोग्यतज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि केअर गिव्हर्स एकत्र येणार आहेत.
डाॅ. निलेश बलकवडे यांनी सांगितले, की वंध्यत्वाच्या विषयी बोलणे टाळले जाते आणि त्यावरील उपचारांची माहितीही मिळत नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. वंध्यत्वाने बाधित जोडप्यांची माहिती व आकडेवारीही यावेळी सादर केली. वंध्यत्वावरील उपचार सुरक्षित आहेत, परवडणारे आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ते केले जातात याची माहिती जोडप्यांना देऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करून हा उपक्रम राबविण्यात येईल. शास्त्रीय अत्याधुनिक उपचार पद्धतीने आजच्या काळात अनेक पर्याय निर्माण केले आहेत. त्यामुळे त्याचा लाभ घेण्यापूर्वी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी वीकॅनकन्सिव्ह ही मोहीम आहे.







Leave a Review