‘राइट टू होम’ प्रदर्शनात प्राॅपटायगरकडून सवलतींचा वर्षाव

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पहिल्या व्हर्च्युअल एडिशन २०२० च्या अभूतपूर्व यशानंतर, प्राॅपटायगर डाॅट काॅम या आॅनलाईन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने पुण्यासह देशभरामध्ये होणाऱ्या राईट टू होम या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन हिंजवडीतील विवांता येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत केले आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या व प्रामुख्याने प्रत्येकी ३० लाख ते १ कोटी रुपये किंमत असलेल्या एकूण ४४८५ सदनिकांची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे.

प्रदर्शनाच्या लाँचविषयी बोलताना श्री राजन सूद, बिझनेस हेड, प्राॅपटायगर डाॅट काॅम म्हणाले, कर्जांवरील सर्वात कमी व्याजदर, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आलेले कलम ८०ईईए (गृहकर्जावर भरलेल्या व्याजातून मिळणारी सूट) यामुळे निवासी सदनिकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी २०२१ हे वर्ष ही एक चांगली संधी आहे. हे पैलू लक्षात घेता आणि खरेदीसंदर्भात ग्राहकांकडून होणाऱ्या सकारात्मक विचारांमुळे – जे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कन्झ्युमर सेंटिमेंट सर्व्हेमध्ये दिसून आले – आम्ही राईट टू होम या प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती यंदा लाँच करत आहोत. यामध्ये पुणे शहराचाही समावेश करण्यात आला असून गृहखरेदीदारांना आघाडीच्या बिल्डर-विकसकांकडून भरघोस सवलती मिळविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. आर्थिक आणि कायदेशीरदृष्टीने क्लिष्ट असणाऱ्या गृहखरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे प्राॅपर्टी एक्सपर्ट ग्राहकांना सर्वतोपरी मदत करणार आहेत.

भागीदारीविषयी बोलताना, श्रीराम महादेवन, व्यवस्थापकीय संचालक आणि बिझनेस हेड – जाॅयविले शापूरजी हाउसिंग प्रा. लि म्हणाले, हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी यंदापेक्षा अधिक चांगला वेळ आणि काळ असू शकत नाही. गृहकर्जाचे व्याजदर ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी आहेत, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे आणि निवासी सदनिकांच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्येही नव्याने उत्साह संचारला असल्याचे दिसून येते. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे सर्वोत्तम व्यासपीठ आणि वेळ आहे.

प्रदर्शनामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचे ब्रँड्स सहभागी झाले आहेत. एकाच ठिकाणी माहिती मिळत असल्यामुळे संभाव्य घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट प्राॅपर्टी निवडण्याची संधी या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे. त्या बरोबरीनेच कोणतेही ब्रोकरेज चार्जेस न भरता आणि अनेक सवलतींचा लाभ खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना घेता येणार आहे.

प्रदर्शनातील रेरा-मान्यताप्राप्त प्रकल्पांमधील सदनिकांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक आॅफर मिळणार आहेत. त्यामध्ये आॅन-स्पाॅट आॅफर, सर्वात स्वस्त पर्याय, पैसे भरण्यासाठीचे वैयक्तिकृत पर्याय, जीएसटी आणि स्टँप ड्युटी शुल्कमाफी, बुकिंग केल्यावर खात्रीशीर मिळणारे सोन्याचे नाणे आणि गृहकर्ज मिळवून देण्यासाठीचे सहाय्य याचा समावेश आहे.

पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीचे विकसक हे या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या प्रकल्पांची माहिती ग्राहकांना देणार आहेत. पूर्वांकार, शापूरजी पॅलाॅनजी, कोहीनूर, गोयल गंगा, पुराणिक, एनबी भोंडवे आदी विकसकांचा त्यामध्ये समावेश आहे. परवडणाऱ्या घरांसह अलिशान घरांपर्यत अशा विविध प्रकारच्या सदनिकांची माहिती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होणार आहे. आॅगस्ट २०२० मध्ये झालेल्या या प्रदर्शनाच्या व्हर्च्युअल स्वरुपाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ३० विकसकांनी व १२००० ग्राहकांनी सहभाग घेतला होता.


Share this Newz