The Newz Biz Team, PUNE
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या खासगी वाहनातून कुटुंबासह प्रवास करताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी चारचाकी वाहनांतून प्रवास करणा-या प्रवाशांनी सक्तीने मास्क घालण्याची अट वगळून कुटुंबासमवेत विना मास्क प्रवास करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
माई ढोरे यांनी सांगितले, की चारचाकी वाहनातून कुटुंबासमवेत प्रवास करताना मास्कची सक्ती मागे घ्यावी, अशी विचारणा नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. सध्या मुंबई पाठोपाठ पुणे शहरात देखील कुटुंबासोबत खाजगी वाहनाने विनामास्क प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
त्यामुळे खाजगी चारचाकी वाहनातून कुटुंबासमवेत प्रत्यक्ष प्रवास करत असताना मास्क घालण्यावरील बंधन उठवून पुणे शहराप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना दिलासा देणेबाबत आपणांकडून संबंधितास योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.










Leave a Review