The Newz Biz Team, PUNE
टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने (टीटीबीएस) स्मार्टफ्लो हा भविष्यासाठी सज्ज असा आधुनिक क्लाऊड कम्युनिकेशन सादर केला आहे, स्मार्टफ्लो कंपनी अंतर्गत कर्मचाऱ्यांदरम्यान आणि कंपनीच्या बाहेर ग्राहक आणि व्हेंडर्ससोबत सर्व प्लॅटफॉर्म्स आणि टच पॉईंट्सवर सर्व हितधारकांदरम्यान कोणताही व्यत्यय येऊ न देता कनेक्टिव्हिटी स्थापित करतो.
स्मार्टफ्लो व्यवसायांना कोणत्याही वेळी, कुठूनही, कोणतीही बाधा न येता, निरंतर संवाद आणि संबंधांमार्फत ग्राहकांसोबतचे आपले नाते अधिक घनिष्ठ करण्यासाठी सक्षम बनवतो.अशाप्रकारे व्यावसायिक विचार आणि कल्पना केवळ क्युबिकल्स पुरत्या मर्यादीत न राहता कर्मचारी आपल्या निवडीनुसार कुठूनही अधिक चांगले काम करू शकतात.
हे अगदी पटकन सेटअप केले जाऊ शकते आणि यासाठी काहीही इंस्टॉलेशन चार्जेस भरावे लागत नाहीत, तसेच कॅपेक्स गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही. स्मार्टफ्लोसोबत ९९.५% ची अपटाइम गॅरंटी दिली जाते, टीटीबीएसच्या २४x७ व्यवस्थापित सेवा क्षमता आणि विश्वास या गॅरंटीचा आधार आहेत, यामुळे व्यवसायांसाठी कोणताही अडथळा न येता व्यवसायांची निरंतरता सुनिश्चित केली जाते.
टाटा टेलि सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष मन्नू सिंग यांनी स्मार्टफ्लोच्या लॉन्चबद्दल म्हणाले की उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता असावी हे आमचे उद्धिष्ट स्मार्टफ्लोमधून दर्शवले जाते, स्मार्टफ्लो व्यवसायांना प्रभावी कामगिरी बजावण्यासाठी सक्षम बनवतो. व्यापक आणि प्रगत वैशिष्ट्यांसह स्मार्टफ्लो व्यवसायांच्या नव्या आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहे. ग्राहकांसोबत संबंध, संवाद कायम ठेवण्यासाठी क्लाऊडवर आधारित प्लॅटफॉर्म्स ज्यांना हवे आहेत अशा व्यवसायांची संख्या वाढत आहे. या अतिशय मोठ्या आणि नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी टीटीबीएस सक्षम आहे.







Leave a Review