महापौर चषक क्रिकेट स्पर्धेत देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

वारजे येथील आलम भाई पठाण क्रिकेट क्लबला द्वितीय, तर दापोडीतील ओम साई इलेव्हनला तृतीय क्रमांक
Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लब (नवी सांगवी) तर्फे आयोजित टेनिस बॉल महापौर चषक क्रिकेट स्पर्धा 2021 चा बक्षीस वितरण समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेत देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने प्रथम क्रमांक, वारजे येथील आलम भाई पठाण क्रिकेट क्लबने द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक दापोडी येथील ओम साई इलेव्हन संघाने मिळविला.

यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका सीमा चौगुले, माधवीताई राजापुरे, मारूती तरटे, माऊली जगताप, धनंजय ढोरे, अजय दुधभाते, जवाहर ढोरे, गणेश बनकर आदी उपस्थित होते.

13 ते 17 जानेवारी दरम्यान या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 33 संघानी सहभाग घेतला होता.

विजयी संघ :

  • प्रथम क्रमांक (55555/-) भव्य चषक – हनुमान मित्र मंडळ (देहूरोड) 
  • द्वितीय क्रमांक (44444/-) भव्य चषक – आलम भाई पठाण क्रिकेट क्लब (वारजे)
  • तृतीय क्रमांक (33333/-) व चषक – ओम साई इलेव्हन (दापोडी)
  • चतुर्थ क्रमांक (22222/-) व चषक – जय गणेश क्रिकेट क्लब (थेरगाव)
  • मालिकावीर पुरस्कार : आनंद चव्हाण
  • उत्कृष्ट फलंदाज : राहुल लोहार
  • उत्कृष्ट गोलंदाज : हरिश अर्जुने

महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचे संयोजन राहुल कोंढरे, सत्यवान भालेराव, समीर जाधव, विनोद कल्याणकर, जीवन जाधव यांनी केले.


Share this Newz