डीकोडने विद्यार्थ्यांसाठी सुरु केला नवा एआय शिक्षण मंच

Share this Newz

The Newz Biz Team, New Delhi

शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप डिकोड ए आय ने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी नवीन  स्वतः कृती करून शिक्षण घेण्याचा मंच सुरु केला आहे. यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी), कंप्युटर व्हिजन (सीव्ही), डेटा सायन्स यांचा समावेश आहे. डिकोड ए आय  Iची सुरुवात या वर्षीच्या सुरुवातीला करण्यात आली. नव्या पिढीला कोडींगची औपचारिक पार्श्वभूमी नसताना देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कौशल्ये मिळवता यावीत हे डिकोड ए आय उद्धिष्ट आहे.

या स्टार्टअपमध्ये सुलतान चांद अँड सन्स (पी) लिमिटेड, एड्युकेशनल पब्लिशिंग हाऊस यांची ५००,००० युएस डॉलर्सची एंजल गुंतवणूक आहे. सध्या १०,००० पेक्षा जास्त शाळा त्यांच्या नेटवर्कचा भाग असून तेथील प्राथमिक व माध्यमिक वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण घेता यावे या उद्देशाने हे स्टार्टअप प्रयत्नशील आहे.

शिक्षण सहजसोपे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करेल, क्षमतांना वाव देईल असे करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि कमी कोड / अजिबात कोड नसलेली टूल्स यावर डिकोड Iचा भर असतो. त्यामुळे कोडिंगची काहीही पार्श्वभूमी नसलेल्यांना देखील  ए आय  मॉडेल्स शिकण्याची व ती वापरण्याची सुरुवात करता येऊ शकते.

डीआयवाय लर्निंग प्रोग्राम्सचा नवा सेट अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना शिकू शकतात आणि डेटा मॅनिप्युलेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन, स्टॅटिस्टिक्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि इतर अनेक विषयातील आपली कौशल्ये वाढवू शकतात. ज्या  विद्यार्थ्यांना चॅटबॉट्स, इमेज रेकग्निशन मॉडेल्स तसेच व्हॉईस रेकग्निशनवर आधारीत बॉट्स आणि होम ऑटोमेशन सिस्टिम्स विकसित करणे शिकायचे आहे त्यांच्यासाठी हे लर्निंग प्रोग्राम्स अगदी योग्य आहेत.

डिकोड ए आय चे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. कार्तिक शर्मा यांनी सांगितले  २०२० मध्ये आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि विकासाच्या एकंदरीत प्रक्रियेत अनेक मोठे बदल घडून आले आहेत. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्वत्र केला जाण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिवर्तनाचा हा प्रवास शालेय स्तरापासून सुरु व्हायला हवा आणि डिकोड ए आय  मध्ये आम्ही हेच करत आहोत.  . तसेच  डेटा सायन्स, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या विषयांवरील ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात येत आहे. 


Share this Newz