The Newz Biz Team, PUNE
सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती), पुणे यांच्या तर्फे महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन प्रदर्शन व विक्रीचे आयोजन सांगवीतील मल्हार गार्डन येथे करण्यात आले आहे. यामध्ये २५ हून अधिक स्टॉल्सवर महिला उद्योजकांकडून सैंधव मीठ, लोणचे, खारे पदार्थ, तसेच बेकरी पदार्थ, देवाची अलंकारिक वस्त्रे, साड्या, ड्रेस, मेणबत्त्या, इतर कपडे आणि अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते.
महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
पद्मा लोहिया, नम्रता नावंदर, गौरी नावंदर, श्रुती मंत्री, जमना राठी, कविता लढ्ढा आदी महिलांनी समिती तर्फे सुव्यवस्थेची जबाबदारी उचलली. या प्रदर्शनात महिलांचा उत्साह पाहून वाखाणण्याजोगा होता.







Leave a Review