सोनालिकाचा टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह १३० देशांमध्ये अव्वल ट्रॅक्टर ब्रँड म्हणून ओळखल्या सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचे डिझाईन युरोपमध्ये करण्यात आले आहे. भारतासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी आवाजविरहित शेती, शून्य कार्बन फूटप्रिंट (प्रदुषण), सहजरित्या घरी चार्जिंग करता येईल आणि शक्तीशाली असा ट्रॅक्टर जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून व नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी सोनालिका ट्रॅक्टर्सची ओळख निर्माण झाली आहे. तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल असे उत्पादन देत जगभरातील शेतीचे आधुनिकीकरण करण्यामध्ये सोनालिकाने पुढाकार घेतला आहे. जगासाठी बनविलेल्या आणि भारतात बनविलेल्या म्हणजेच मेक-इन-इंडियाचे हे उत्तम उदाहरण आहे.

ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आधारे नवीन टप्पा निर्माण करणाऱ्या भारतातील पहिल्या फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सोनालिका टायगर इलेक्ट्रिकमध्ये अत्याधुनिक अशी आयपी६७ अनुसार बनविलेले २५.५ किलोवॅटची नैसर्गिक कुलिंग देणारी काॅम्पॅक्ट बॅटरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक डिझेलच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश इंधन खर्च होणार आहे. घरामध्ये असलेल्या नेहमीच्या चार्जिंग पाॅईंटवरून दहा तासात पूर्णपणे चार्ज होणारी ही उच्च दर्जाची नावीन्यपूर्ण बॅटरी टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात आली आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी वारंवार पेट्रोल पंपावर जाण्याची गरज शेतकऱ्यांना यापुढे भासणार नाही.

टायगर इलेक्ट्रिकची उर्जा बचत करणारी इट्रॅक मोटर सर्वोत्तम परफाॅर्मन्स देण्यासाठी शून्य आरपीएम ड्राॅपसह सर्वाधिक पाॅवर डेन्सिटी आणि पीक टाॅर्क देते. त्यामुळे कितीही लोड असला तरी सर्वात जलद पिक-अपकरिता ट्रॅक्टरला लागणारी पाॅवर १०० टक्के वेळा आणि १०० टक्के टाॅर्कची उपलब्धतता ही या जर्मन डिझाईनच्या मोटारीमुळे मिळते. हा अत्याधुनिक ट्रॅक्टर बुकिंगसाठी उपलब्ध असून सुरवातीची आॅफर म्हणून त्याची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात दाखल करण्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्सने नेहमीच पुढाकार घेतला आहे. शेतीची उत्पादकता आणि फायदा दोन्ही वाढविण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना कायम नवीन तंत्रज्ञानाधारित पर्याय देण्याचे आमचे आश्वासन टायगर इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करत आहोत. जागतिक मानकांनुसार तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीचे आधुनिकीकरण करण्याबरोबर संकल्पना आणि प्रत्यक्षातील उत्पादन या दोन्हीतील अंतर आम्ही या नवीन उत्पादनामार्फत कमी केले आहे. पर्यावरणपूरक आणि प्रदुषणविरहित अशा भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून वापरण्यास सोपा राहील अशा पद्धतीने हे उत्पादन सोनालिकाच्या विश्वासार्ह प्लॅटफाॅर्मवर विकसित करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले, भारत सरकारने जाहीर केलेल्या २०३० पर्यंत संपूर्ण इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या महत्त्वाकांक्षी उद्दीष्टाला अनुसरून आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सोनालिकाने टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल केला आहे.


Share this Newz