नेजल स्प्रेच्या व्यावसायिक सादरीकरणाबाबत ग्लेनमार्क व मेनारिनी यांच्यात करार

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

बाल्कन प्रदेशासह युरोपातील ३३ देशांमध्ये रयालट्रीस या नावीन्यपूर्ण नेजल स्प्रेच्या व्यावसायिक सादरीकरणासाठी मेनारिनी ग्रुप बरोबर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संधोधन-प्रेरित जागतिक एकात्मिक फार्मास्युटिलकल कंपनीच्या स्पेशॅल्टी एसए या स्वीस सबसिडायरी कंपनीने एक्सक्ल्युझिव्ह लायसन्सिंग अॅग्रीमेंट केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ग्लेनमार्कने विकसित केलेल्या रयालट्रीस (ओलोपॅटडाईन हायड्रोक्लोराईड आणि मोमेटासोन) हे एक नावीन्यपूर्ण उत्पादन आहे. बारा वर्षापुढील व्यक्तींना सिझनल अॅलर्जिक ह्रिनिटीस (एसएआर) या आजाराच्या लक्षणांवर उपाय म्हणून या अँटी-हिस्टमाईन व स्टेराॅईडच्या फिक्स्ड-डोस काॅम्बिनेशनचा नेजल स्प्रे प्रभावी ठरतो.

करारानुसार, युरोपीयन रेग्युलेटरी आॅथिरिटीकडून सर्व कायदेशीर परवानग्या घेण्याची जबाबदारी ग्लेनमार्ककडे असणार आहे. तर या बाजारपेठेतील आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर विज्ञानाधारित-माहिती आणि व्यावसायिक सादरीकरणाची जबाबदारी मेनारिनी ग्रुपकडे असणार आहे. रयालट्रीसच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नासह संपूर्ण करारासाठीचे पैसे ग्लेनमार्कला मिळणार आहेत.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिका व लाटम प्रदेशाचे (ईएमईए-एल) बिझनेस हेड अचिन गुप्ता म्हणाले, युरोप प्रदेशात रयालट्रीससाठी मेनारिनी बरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होतो आहे. या प्रदेशामध्ये श्वसनाशी संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक सादरीकरणाचा आणि भागीदारीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. युरोपमध्ये रेस्पिरेटरी उत्पादनांबाबत ग्लेनमार्कचे लक्ष आहे हे बिंबवण्यासाठी ही भागीदारी एक महत्त्वाचे व पुढचे पाऊल आहे. काही बाजारपेठांमध्ये रयालट्रीसचे व्यावसायिक सादरीकरण हे ग्लेनमार्क स्वतः करणार आहे, तर युरोप प्रदेशासाठी या भागीदारीमुळे चांगला प्रतिसाद मिळेल. जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये सादरीकरण झालेला ग्लेनमार्कचा पहिला ग्लोबल ब्रँड म्हणून रयालट्रीसला पुढे आणण्याचे आमचे उद्दिष्टही सफल होत आहे.

मेनारिनी ग्रुपचे महाव्यवस्थापक पिओ मे म्हणाले, अॅलर्जी आणि रेस्पिटेरी उत्पादनांच्या शृंखलेमध्ये रयालट्रीसची भर पडणे ही चांगली घडामोड आहे. हे नावीन्यपूर्ण उत्पादन रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी आमच्या अनुभवाचा रास्त उपयोग होणार आहे. रयालट्रीसच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची आम्ही वाट पाहात आहोत. हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात दाखल करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत.


Share this Newz