The Newz Biz Team, PUNE
क्रस्ना डायग्नोस्टिकच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने नागरिकांना रिटर्न गिफ्ट म्हणून ‘दहा दिवस, दहा टेस्ट, दहा रुपयात’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, येत्या 2 जानेवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे, अशी माहिती क्रस्ना डायग्नोस्टिकच्या संचालिका पल्लवी जैन यांनी दिली.
क्रस्ना डायग्नोस्टिकचा वर्धापनदिन चिंचवड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी, तसेच झुम’द्वारे भारतातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
क्रस्ना डायग्नोस्टिकच्या दहा वर्षातील कामगिरीविषयी बोलताना पल्लवी जैन यांनी सांगितले, की समाजातील उपेक्षित, गरीब लोकांचे पैशाअभावी वैद्यकीय उपचार थांबू नयेत, या उद्देशाने 2010 मध्ये क्रस्ना डायग्नोस्टिकची सुरुवात करण्यात आली. गेल्या दहा वर्षांमध्ये संस्थेचा विस्तार करून 14 राज्यात 2000 हून अधिक ठिकाणी डायग्नोस्टिक सेवा देत आहोत. आम्हाला आव्हाने स्वीकारायला आवडते. त्यामुळेच आम्ही हा विस्तार करू शकलो. हा विस्तार करताना गुणवत्तेत थोडीही ॲडजस्टमेंट न करता अत्यंत कमी दरामध्ये टेस्ट करण्यात येतात.
कोरोना काळातही कामाचा खुप ताण होता. परंतु आम्ही 300 नवीन लोकांना काम देऊन कोविड 19 टेस्ट सेंटर सुरु करुन सेवा दिली. कोविड रुग्णांचे आव्हान स्वीकारून आणि आपली जबाबदारी ओळखून कर्मचाऱ्यांनीही कोविदच्या टेस्ट केल्या. या दरम्यान चोवीस तास सेवा सुरू होती. अगदी शंभर सॅम्पल पासून सुरुवात करून दहा हजार सॅम्पलचे रिपोर्ट 24 तासात देण्याचे कठीण काम आमच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. कोविड 19 टेस्टिंग बस सुरू करून आम्ही त्या त्या भागातील रुग्णांपर्यंत पोहोचलो. ही आशिया खंडातील पहिली बस ठरली. या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक झाले. तसेच कोरोना रुग्णांसाठी ही बस मोठी फायदेशीर ठरली.
संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्ही दहा दिवस-दहा टेस्ट-दहा रुपयात उपक्रम राबवित असून, पुणे व पिंपरी चिंचवडमधील क्रस्ना डायग्नोस्टिकच्या कोणत्याही सेंटरवर टेस्ट करता येणार आहेत.
सर्वजण मिळून काहीतरी चांगले करूया, याप्रमाणे आमची वाटचाल सुरू असून, याचाच पुढचा टप्पा म्हणून डिजिटल इंडिया अभियानांतर्गत क्रस्ना डायग्नोस्टिक मोबाइल ऍप सुरू करीत आहे. यामुळे रुग्णांना खूप मोठा फायदा होणार असून, त्यांची सर्व वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे. तसेच इतर ठिकाणच्या डॉक्टरांना ही माहिती शेअरही करता येणार आहे.
-पल्लवी जैन, संचालिका, क्रस्ना डायग्नोस्टिक







Leave a Review