जगदाळे हेल्थकेअर तर्फे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मुलिम्ना पेय बाजारात दाखल

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

जगदाळे हेल्थकेअर या जगदाळे इंडस्ट्रीज च्या सहाय्यक कंपनीने तिच्या मुल्मिना या आरोग्य पेयाच्या नैदानिक अभ्यासाचे निकाल नुकतेच जाहीर केले. हे पेय मुलांसह सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. मुल्मिना हे नैसर्गिक सुपरफूड्स पासून बनविण्यात येते. टेट्रा पॅक मध्ये मिळणारे हे पेय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व अँटीऑक्सिडंट आहे. या पेयातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गुणधर्मांमुळे ते इतर आरोग्यपेयांपेक्षा वेगळे आणि अधिक आरोग्यदायी आहे.

मुल्मिना मॅंगो  (आंबा, ब्राम्ही व हळद यांचे मिश्रण) आणि मुल्मिना ऑरेंज  (आवळा व संत्रे यांचे मिश्रण) या उत्पादनांचा नैदानिक स्वरुपाचा अभ्यास एका प्रख्यात वैद्यकीय संस्था व संशोधन केंद्रामध्ये नुकताच करण्यात आला. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट मार्कर्स व व इम्यून मार्कर्स यांच्यामध्ये १४ व २८ दिवसांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच, सी-रिअॅक्टिव प्रोटीन सारख्या (सीआरपी) इम्फ्लेमेटरी मार्कर्स चे प्रमाण कमी होते, असेही या अभ्यासात सिद्ध झाले. कोविडची लक्षणे नसलेल्या, तसेच कमी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये आणि एनएबीएच मान्यताप्राप्त अशा प्रख्यात वैद्यकीय संशोधन संस्थेतील कोविड वॉर्डांमध्ये काम करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती व अँटीऑक्सिडंट क्रिया वाढल्याचे या अभ्यासात आढळून आले.

जगदाळे इंडस्ट्रीज चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश जगदाळे या संदर्भात म्हणालेमुल्मिना मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून ते वेगवेगळ्या ऋतुंमधील आजारांवर मात करण्याइतके समर्थ बनत असल्याचा सकारात्मक निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे. त्यामुळे देशातील कोविडच्या साथीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. प्रतिकारशक्ती वाढविण्याबद्दल शास्त्रीयदृष्ट्या सिध्द असलेला मुल्मिना हा आहार अनेक आजारांवर मात करण्यात भविष्यात सहाय्यभूत ठरणारा आहे. तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग निश्चितच बनणार आहे. आज प्रत्येक व्यक्तीस योग्य रोगप्रतिकारक पोषण मिळण्याचा हक्क आहे आणि हा विचार प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.


Share this Newz