पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

जुनी सांगवीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतर्फे फटाके वाजवून व लाडू वाटप करून विजयोत्सव
Share this Newz

The Newz Biz Team , Pune

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. या विजयाबद्दल जुनी सांगवी परिसरातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून फटाके वाजवून व लाडू वाटप करून विजयोत्सव साजरा केला.

जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर स्मारक चौकात कार्यकर्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत फटाके वाजवून जल्लोष केला.

महाविकास आघाडीने मिळविलेल्या विजयाबद्दल बोलताना प्रशांत शितोळे यांनी सांगितले, महाविकास आघाडीने पदवीधरांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडवून काम करावे. याच बरोबर या विजयामुळे निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. हे या विजयावरून सिद्ध झाले आहे.

यावेळी प्रशांत शितोळे, शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनील ढोरे, उज्ज्वला ढोरे, दीपक ढोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदामराव ढोरे, कुंदन कसबे, रोहित शेळके, सिकंदर पोंगडे, विजय साने, स्वरूपा खापेकर, चेतन शिंदे, ऋतुजा बिराजदार, गौरव चौधरी, वीरेंद्र गायकवाड, बाबा खराडे, रोहित शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Share this Newz