The Newz Biz Team, Pune
कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासून भारतीय इक्विटी बाजारात अनेक मोठमोठे चढ-उतार झाले आहेत. बाजाराच्या निर्देशांकांनी अभूतपूर्व पातळ्यांवर उच्चांक व नीचांक नोंदवले आहेत. आपल्या कामकाजाच्या पद्धतींत सर्वच कंपन्या फेररचना करीत असताना, त्यांत तंत्रज्ञानाच्या स्वीकृतीला महत्त्व येत आहे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनालाही चालना मिळाली आहे.देशात व जागतिक पातळीवर सुरू असलेल्या स्थित्यंतरांना कोविडच्या साथीमुळे वेग आला आहे व सरकारचे प्रयत्न, जागतिक गुंतवणूक व देशांतर्गत कल्पकता साध्य करण्यावर भर अशा मॉडेल्समधून आपल्याला आतापर्यंत अनोख्या, परिवर्तनीय अशा काही योजना राबविता आल्या, उदा.आधार, यूपीआय, इत्यादी.
सामान्यत: स्थित्यंतरांमधील नाविन्यता ओळखण्यात आर्थिक बाजारपेठा धीम्या असतात आणि अनपेक्षित बदलांच्या परिणामांकडे अनेकदा गुंतवणुकदारांचेही दुर्लक्ष होत असते. त्यामुळे बाजारातील अपेक्षा आणि वास्तविक वाढीची संभाव्यता यांदरम्यान मोठी तफावत आढळते. अॅक्सिस स्पेशल सिच्युएशन फंड हा ‘अॅक्सिस एएमसी’चा एक समर्पित इक्विटी फंड तयार करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. तो भारतीय आणि जागतिक बाजारपेठांमध्ये अशा संधींवर लक्षकेंद्रित करतो आणि गुंतवणूक करतो.या नवीन फंडासाठीची नोंदणी (एनएफओ) ४ डिसेंबरपासुन करता येईल
‘अॅक्सिस स्पेशल सिच्युएशन्स फंड’ ही ‘ओपन-एंडेड इक्विटी’ योजना सादर करण्याची घोषणा करण्यास ‘अॅक्सिस एएमसी’ उत्सुक आहे. यामध्ये विशेष परिस्थिती ही संकल्पना घेण्यात आली असून स्थित्यंतरातील प्रगतीच्या संधींमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आला आहे. या फंडामुळे स्थित्यंतराच्या संपूर्ण मूल्य शृंखलेतील संधी मिळविणे गुंतवणूकदारांना शक्य होईल. हा फंड देशांतर्गतआणि जागतिक बाजारपेठेत तसेच विविध मार्केट कॅप स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करेल – यामुळे गुंतवणूकदारांना बाजाराच्या कोणत्याही विभागातील संबंधित संधींमध्ये भाग घेता येईल. परदेशी गुंतवणूकीचा सल्ला श्रोडर या कंपनीकडून देण्यात येईल.
यावेळेस अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश कुमार निगम म्हणाले, अॅक्सिस एएमसी’ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्मितीस मदत होऊ शकेल, अशा नवीन फंड कल्पना आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गुणवत्तेवर लक्ष देत जबाबदार गुंतवणूक या काळानुरुप सिद्ध झालेल्या तत्त्वज्ञानावर आमच्या उत्पादनांचा विकास आधारलेला आहे.
‘अॅक्सिस स्पेशल सिच्युएशन्स फंड’ सादर करून आम्ही उद्योगासाठीअग्रगण्य असा मालमत्ता व्यवस्थापन प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेने प्रवास चालू ठेवला आहे. त्यातून आमच्या सर्व गुंतवणूकदारांनी गरज भागू शकेल. तंत्रज्ञानातील गतीमान बदल आणि नाविन्यता यांच्या माध्यमातून आपल्या भोवतालचे जग परिवर्तनाच्या दिशेने जात असताना, गुंतवणूकदारांना भारतीय किंवा जागतिक बाजारपेठेत या थीममध्ये सहभागी होण्यास व त्याद्वारे लाभ घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.







Leave a Review