The Newz Biz Team, Pune
इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्स (आयओआय) २०२१ या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम सुरू करीत असल्याची घोषणा अनअॅकॅडेमी शिक्षण मंचातर्फे करण्यात आली आहे.
आयओआय स्पर्धेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उपजत बुद्धी विकसित करण्यासाठी व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोडशेफ तर्फे २०१३ मध्ये गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. 2020 मध्ये अनअॅकॅडेमीने कोडशेफ ताब्यात घेतली. गो-फॉर-गोल्ड उपक्रमाचा भाग म्हणून, अनअॅकॅडेमी तर्फे आयओआय २०२१ या परिक्षेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला १५ लाख रुपयांचे रोख बक्षिस, तसेच एक लॅपटॉप आणि इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कोडचेफ ने अनअॅकॅडेमी च्या प्लॅटफॉर्मवर आयओआयच्या तयारीसाठी एक विनामूल्य शिक्षण कार्यक्रमदेखील सुरू केला आहे. या शिक्षण कार्यक्रमात विषयवार लाइव्ह वर्ग, रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि कोडचेफ स्वयंसेवकांच्या नेतृत्वात शंका-निराकरण सत्र आयोजित करण्यात येते.
आयओआय मध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या चार भारतीय विद्यार्थ्यांची निवड इंडियन कम्प्युटिंग ऑलिम्पियाड’ (आयसीओ) नावाच्या राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड द्वारे केली जाते. आयसीओ ही स्पर्धा इंडियन असोसिएशन फॉर रिसर्च इन कंप्यूटिंग सायन्स (आयएआरसीएस), कोडशेफ आणि टीसीएस आयओएन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
झोनल इनफॉरमॅटिक्स ऑलिम्पियाड (झेडआयओ) ही आयसीओची पहिली फेरी १९ डिसेंबर २०२० रोजी होईल. या फेरीसाठी कुठल्याही प्रोग्रामिंगची आवश्यकता नाही. यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे., इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्सची स्पर्धा फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे. या मधील २५० विद्यार्थ्यांची आयएनओआय साठी निवड करण्यात येईल. या फेरीसाठी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग येण्याची आवश्यकता आहे. आयओआय प्रशिक्षण शिबिर मे २०२१ मध्ये चेन्नई येथे होणार असून, त्यासाठी ३० विद्यार्थ्यांची नावे निवडली जातील आणि इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इनफॉरमॅटिक्स ही शेवटची फेरी सिंगापूरमध्ये घेण्यात येईल. यामध्ये आयओआयटीसीच्या पहिल्या चार विद्यार्थ्यांना यात भाग घेण्याची संधी मिळेल.
अनअॅकॅडेमी मधील कोडशेफ व्यवसाय प्रमुख अनूप काळबालिया म्हणाले, की प्रतिष्ठित अशा आयओआयमध्ये यश मिळविण्याकरीता भारतीय विद्यार्थ्यांना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून कोडशेफ चा गो-फॉर-गोल्ड हा उपक्रम अनअॅकॅडेमी ने सुरू ठेवला, याबद्दल आम्ही अत्यंत आनंदित आहोत. शालेय अभ्यासक्रमात समस्यांचे निराकरण व इनफॉरमॅटिक्स हे दोन विषय समाविष्ट करण्यात यावेत, यासाठी जनजागृती करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देण्याचे आमचे ध्येय आहे आणि याबाबतीत अनअॅकॅडेमी आमच्या बरोबर असणार आहे.









Leave a Review