चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी ऑरिआना प्युरिट रेंजची उत्पादने बाजारात

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

ऑरिआना प्युरिट रेंजने तेलकटपणा घालवण्यासाठी त्वचेच्या नैसर्गिक रचनेशी सुसंगत प्युराइट ऑइल कंट्रोल फेस वॉश, प्युराइट जॅकने डिजॉल्वर जेल आणि प्युराइट ऑइल कंट्रोल डे क्रीम ही उत्पादने बाजारात आणली असून, यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा आणणा-या तैलग्रंथींपासून मुक्ती मिळते. ही उत्पादने त्वचा गुळगुळीत, मृदु आणि चमकदार करतात, असा दावा कंपनीने केला आहे.

प्युराइट ऑइल कंट्रोल फेस वॉशमध्ये तेलाला रोखणाचा खास गुणधर्म असल्यामुळे मुरूम आणि मुरुमाचे वण लक्षणीय प्रमाणात कमी होतात. जळजळ प्रतिबंधक, मुरुम विरोधक आणि शुद्धीकरण करणारे घटक त्वचा गुळगुळीत, नितळ आणि तेलरहित होते. कडुनिंब अर्क आणि कोरफडीचा रस यांनी युक्त असा हा फेसवॉश त्वचेला निरोगी ठेवतो आणि तिची आर्द्रता टिकवतो तसेच सीबम स्नेहग्रंथींचा स्त्राव नियंत्रित करून मुरुम आणि ब्लॅक हेड्स यांना प्रतिबंध करतो.

प्युराइट जॅकने डिजॉल्वर जेलमध्ये चेह-यावरच्या पुटकुळ्यांची गंभीर समस्या दूर करण्याच्या क्षमतेचे उच्च तंत्रज्ञान वापरून तयार केलेले घटक असतात. ही जेल त्वचेच्या रंध्रातून प्रवेश करून मुरुम मुळापासून कमी करते. त्यातील बॅक्टेरियाविरोधी घटक त्वचा निरोगी ठेवतो आणि तिला नवी झळाळी प्राप्त करून देतो.


Share this Newz