The Newz Biz Team, Pimpri Chinchwad
पिंपळे गुरव येथील मुक्तांगण महिला गृह उद्योग संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव परिसरात साफसफाई करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना दीपावलीचा फराळ स्वतः संस्थेच्या महिलांनी बनवून वाटप करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्ष कावेरी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कावेरी जगताप, निर्मला नवले, मनीषा काटे, कस्तुरी कोलते, कविता दळवी या महिलांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला.
या प्रसंगी श्री गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, आरोग्य निरीक्षक माने, सोमनाथ नवले, मुकादम राजू कदम, प्रतीक टांक, आकाश नवले, भारत नवले, दुर्वांकुर कवडे, प्रसाद नवले, अमित कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.







Leave a Review