गरवारे पॉलिस्टरला दुसऱ्या तिमाहीत 61.30 कोटी रुपये स्टँडअलोन करपूर्व नफा

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

गरवारे पॉलिस्टर लि. (जीपीएल) या गरवारे समूहाच्या प्रमुख कंपनीने आणि भारतातील स्पेशल्टी पॉलिस्टर फिल्म्समधील आघाडीच्या कंपनीने सप्टेंबर 30, 2020 पर्यंतच्या तिमाहीतील निकाल नोव्हेंबर 10, 2020 रोजी जाहीर केले आहेत.

सप्टेंबर 30, 2020 पर्यंत, एकूण खर्च 192.85 कोटी रुपये झाला, त्यामध्ये सप्टेंबर 30, 2019 पर्यंतच्या अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत 5.3% घट झाली. ऑपरेटिंग EBITDA मध्ये 111% म्हणजे 34.23 कोटी रुपयांवरून (आर्थिक वर्ष 2020-21 मधील पहिली तिमाही) 72.22 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. कंपनीने तिमाहीमध्ये 61.30 कोटी रुपये करपूर्व नफा नोंदवला. या तुलनेत सप्टेंबर 30, 2019 पर्यंत 36.14 कोटी रुपये होता. तिमाहीत कन्सॉलिडेटेड एकूण उत्पन्न व करोत्तर नफा अनुक्रमे 252.07 कोटी रुपये व 37.76 कोटी रुपये होता.

निकालांविषयी बोलताना, जीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. बी. गरवारे यांनी म्हटले, “दुसऱ्या तिमाहीमध्ये आम्ही केलेली कामगिरी अतिशय समाधानकारक आहे. कामगिरीमध्ये झालेल्या सातत्यपूर्ण सुधारणेतून आम्ही चोखपणे करत असलेली अंमलबजावणी स्पष्ट होते. या कामगिरीमुळेच आर्थिक वर्ष 21 मधील दुसऱ्या तिमाहीत पीबीडीटी मार्जिन 26.4%  पर्यंत वाढले. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, 47.78 कोटी रुपये या नियोजित गुंतवणुकीनुसार गुंतवणूक केली आहे. या आर्थिक वर्षात वाढ साध्य करण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रगतीसाठीचा आमचा हा दृष्टिकोन विचारात घेता, कंपनीचे भवितव्य उज्ज्वल व सुरक्षित आहे, असे आम्हाला वाटते.”


Share this Newz