The Newz Biz Team, Pune
आयसीआयसीआय होम फायनान्सने (आयसीआयसीआय एचएफसी) सध्याच्या सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना अधिक जास्त आनंद मिळवून देण्यासाठी ‘महा लोन फेस्टिवल’ सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय एचएफसीच्या ‘महा लोन फेस्टिवल’ मध्ये कर्ज घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना होम लोन (अपना घर आणि अपना घर ड्रीम्ज), गोल्ड लोन आणि मायक्रो एलएपी (संपत्तीवर कर्ज) यासारख्या उत्पादनांसाठी तातडीने मंजुरी देण्याची सुविधा सुरु केली आहे. कर्ज प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी आयसीआयसीआय एचएफसीने सर्व कर्ज अर्जासाठी स्थानिक, शाखा स्तरीय मंजुरी सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत.
सणासुदीच्या काळात आयसीआयसीआय एचएफसीने अर्थव्यवस्थेतील अनौपचारिक क्षेत्रातील ग्राहकांना गृह कर्ज सुविधा प्रदान केल्या आहेत. यामध्ये सुतार, प्लम्बर्स, छोट्या व्यवसायांचे मालक आणि ट्रेडर्स यांचा समावेश आहे. आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी उत्सुक सर्व लोक आयसीआयसीआय एचएफसीमध्ये मोजकी कागदपत्रे देऊन आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतात. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आधीच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट सादर करून ग्राहक या सुविधांचे लाभ मिळवू शकतात. व्यावसायिक व व्यापारी आपल्या अत्यावश्यक आर्थिक गरजांसाठी आयसीआयसीआय एचएफसीच्या शाखेमध्ये फक्त एकदा जाऊन गोल्ड लोन मिळवू शकतात. बुलेट रिपेमेंट, कर्जाच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर व्याज दर आणि कालावधी समाप्त होण्याआधी कर्जाची परतफेड हे विशेष पर्याय गोल्ड लोन योजनेत उपलब्ध आहेत.
आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे एमडी व सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले, “महा लोन फेस्टिवलमध्ये आम्ही अनेक वेगवेगळी उत्पादने आणि लाभ सादर करत आहोत, ज्यामुळे अनौपचारिक क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक पर्याय त्यांना उपलब्ध होत आहेत. कमीत कमी कागदपत्रांसह तातडीने कर्ज दिली जावीत यासाठी आमच्या प्रत्येक शाखेमध्ये स्थानिक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.
गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) २.६७ लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. ही अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गट (एमआयजी – I आणि II) यांना मिळणारी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (व्याजातील सबसिडी) आहे.







Leave a Review