The Newz Biz Team, Mumbai
नेटाफिम इंडिया हा स्मार्ट सिंचन पद्धतीचा पुरवठादार असून, या माध्यमातून FlexNet™ – भारतीय शेतकऱ्यांचे काम सुलभ म्हणजेच #FarmingSimplified करण्याच्या उद्देशाने जमिनीवरील आणि भूमिगत ठिबक सिंचन प्रणालीतील क्रांतिकारी मेनलाईन आणि सब-मेनलाईन पाईपिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हा बहुढंगी पाईपिंग पर्याय रब्बी, खरीप, भाजीपाला, भोपळावर्गीय फळभाज्या तसेच शेतात ओळीने लावण्यात येणाऱ्या अन्य पिकांच्या ठिबक सिंचनाकरिता वापरला जातो. या उत्पादनाचे अनावरण सोशल मीडिया मंचावर नेटाफिम इंडियाचेव्यवस्थापकीय संचालक श्री. रणधीर चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील सुमारे 25 लाख शेतकरी या कार्यक्रमाचे साक्षीदार होते.
नेटाफिम’चे FlexNet™ ही आटोपशीरपणा आणि सुलभतेच्या निकषांवर पारंपरीक पीव्हीसी तसेच लेफ्लॅट ट्युबिंग सिस्टीमपासून निराळी ठरते. या उत्पादनाची आणखी जमेची बाजू म्हणजे हे वजनाला हलके, तरीही मजबूत आहे. हे शेतात बसविण्यास तसेच वापरण्याकरिता अधिक उपयुक्त आहे. या उत्पादनाचे वजन कमी असल्याने याची ग्राहकाच्या गरजेनुसार ड्रीपलाईन बसविण्यासाठी ठराविक अंतरावर असणारे आऊटलेट (कस्टमाईज्ड आऊटलेट स्पेसिंग) व खास करून तयार करण्यात आलेल्या ड्रीपलाईन कनेक्टर यामुळे शेतकरी अगदी सहज याचे लेआऊट करून पोर्टेबल पाईप शेतात बसवू शकतात. या वैशिष्ट्यामुळे ही प्रणाली शेतात बसविण्याकरिता वेळेची बचत होते. शिवाय, पारंपरीक पीव्हीसी आणि लेफ्लॅट बसविण्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या मजुरी खर्चात 30% ची बचत होते.या उत्पादनाचे मटेरियल पेटंट केल्याने ते टिकण्यास उत्तम आहे. याची विविंग टेक्नोलॉजी उत्पादनाच्या सहज वाहतुकीकरिता आवश्यक असणारी बळकटी आणि लवचिकता प्रदान करते. यामधील महत्त्वपूर्ण वेल्डेड कनेक्टर पाईन व लॅटेरलमधून जाणाऱ्या प्रवाहाला सुरक्षित ठेवते, शिवाय त्यातून पाण्याचा अपव्यय होणार नाही म्हणून त्याला लिक-प्रूफ करण्याचीखातरजमा करतात. जेणेकरून सिंचन कार्यक्षमता वाढते. उत्तम पीक उत्पादनाच्या दृष्टीने एकसमान जलप्रवाहाची खात्री राहते.
ही नव्या युगाची जलवाहिनी प्रणाली शेतकऱ्यांना स्मार्ट आणि टिकाऊ सिंचन यंत्रणा देऊ करते. हिचे दर्जेदार पॉलिप्रोपलिन मटेरियल अतिशय लहरी हवामानात आणि पर्यावरणीय स्थितीत एका जागी स्थिर राहते आणि त्यामुळे ते हलत नाही. यामुळे तणांना अटकाव होतो तसेच चिखल होऊन ठसे उमटत नाहीत. याचे श्रेय प्रणालीकरिता वापरण्यात आलेल्या पेटेंटेड आऊटलेट आणि पाईपमधील असलेल्या सीलला जाते. ज्यामुळे वर्षानुवर्षे सर्वोच्च कामगिरीची खातरजमा राहते. सर्व नेटाफिम प्रणालींमध्ये ब्रांचींग व लॅटेरल कनेक्टर्सचा चांगला ताळमेळ असतो. हिचा पांढरा रंग थर्मलरेझिस्टंट आहे. मोठ्या प्रमाणावरील रसायनांचा मारा आणि अतिनील किरणांचा यावर परिणाम होत नाही.
नेटाफिम इंडियाचे FlexNet™उत्पादन 2 इंच ते 5 इंच व्यास आकारमानात उपलब्ध असून, पाईप वॉल्व, ड्रीपलाईन कनेक्टर, पाईप कनेक्टर आणि पंक्चर किटसोबत येतात. सबमेन लाईनची आऊटपूट अनुक्रमे 2.5 (अडीच), 4, 5 आणि 6 फूट याप्रमाणे आहे. याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे सबमेन लाईनच्या शेवटी एन्ड कॅप दिली आहे. स्वच्छता राखण्यासाठी सहज उघडता येते. सर्व नेटाफिम प्रणालींसोबत सक्षम ब्रांचींग व लॅटेरल कनेक्टर्सची पूर्ण श्रेणी येते. काही कारणास्तव जलवाहिनी फुटली तर पंक्चर किटच्या साह्याने कोणत्याही अतिरिक्त मेहनतीशिवाय तिची दुरुस्ती शक्य आहे. त्याकरिता कोणत्याही विशेष मदतीची आवश्यकता नाही. हे आटोपशीर पाईपिंग सोल्यूशन सहज, पटकन काढून ठेवता येते आणि सिंचनकाम पूर्ण झाल्यानंतर घरात कुठेही ठेवणे शक्य आहे..
लॉन्चप्रसंगी आपले विचार मांडताना नेटाफिम इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर रणधीर चौहान म्हणाले की, “नेटाफिम इंडिया भारतीय शेतकऱ्यांना अद्वितीय आधुनिक फार्मिंग सोल्यूशन देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. भारतीय कृषी क्षेत्रावर लहान जमिनींचे अधिराज्य आहे. भारतीय शेतकरी वर्ग कोणत्याही आधुनिक, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानापासून वंचित राहता कामा नये, हा आमचा प्रयत्न आहे. FlexNet™चे सादरीकरणयाच उद्देशाच्या केंद्रस्थानी असून #FarmingSimplified (शेतीचे सुलभीकरण) ला वाहिलेले आहे.सर्वोत्तम तंत्रज्ञान हे उत्पादन निर्मितीचे बीज असून शेतकऱ्यांना सर्वोत्तम साह्य आणि शेतांवर अंकुश ठेवण्याची प्रणालीदेण्याचे या पाईपिंग सोल्यूशनचे उद्दिष्ट आहे.
नेटाफिम इंडियाच्या वतीने आगामी वर्षात FlexNet™च्या लॉन्चसमवेत 1 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणून भारतातील 50,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. महाराष्ट्रात अतिरिक्त 20-25% शेतकरीसमुदायापर्यंत पोहोचण्याचा तसेच ~4,300 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचा कंपनीचा मनोदय आहे.







Leave a Review