चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहरात अप्पर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना समितीचे कार्यालय सुरू करण्यात आले.
गेल्या 32 वर्षांपासून अंध, अपंग, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना स्वारगेट येथे खडक माळ आळी तहसील कार्यालयामध्ये जावे लागत होते. नागरिकांचा जाण्या-येण्याचा त्रास वाचावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. या बद्दल आमदार जगताप यांचा नसगरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
चिंचवड मतदारसंघाचे संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संजय मराठे, राजेंद्र पाटील, आदिती निकम, दिलीप गडदे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.











Leave a Review