केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Share this Newz

The Newz Biz Team, New Delhi

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विटर वरून याबाबत माहिती दिली.

2 ऑक्टोबरच्या रात्री झाली होती हार्ट सर्जरी

रामविलास पासवान हे मागील एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. एम्समध्ये 2 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर हार्ट सर्जरी झाली होती. ही पासवान यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. यापूर्वी त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती.

 


Share this Newz