Google Meet चे फ्री व्हर्जन होणार बंद; उद्यापासून चार्जेस लागू

Share this Newz

The Newz Biz Team, नवी दिल्ली

करोनाकाळात सर्च इंजिन कंपनी गुगलने (Google) आपली Google Meet सर्व्हिस पूर्णपणे मोफत केली होती. मात्र, आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप Google Meet संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, गुगल आता Google Meet चे फ्री व्हर्जन बंद करणार असून, 1 ऑक्टोबर पासून चार्जेस लागू करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2020 नंतर Google Meet फक्त 60 मिनिटांसाठी विनामूल्य वापरले जाऊ शकते. यानंतर युजर्संना या सेवेसाठी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच, केवळ पेड युजर्संना मोठ्या कालावधीच्या मिटिंग्ज घेता येणार आहेत आणि बाकीच्यांना पूर्वीसारखी अनलिमिटेड व्हिडिओ मिटिंग्ज करण्याचा ऑप्शन दिसणार नाही.

रिपोर्टनुसार, 30 सप्टेंबरनंतर Google Meetची नवीन पॉलिसी G Suite आणि G Suite Education या दोन्हींवर लागू होणर आहे. या वर्षाच्या सुरूवातीस गुगलने असे म्हटले आहे की, मीट ॲपवर व्हिडिओ कॉल करण्याची वेळ मर्यादा 60 मिनिटे असणार आहे. मात्र, कोरोना संकट काळात युजर्स Google Meet चा वापर वर्क फ्रॉम होम, मिटिंग (Meeting) आणि विद्यार्थी आपल्या ऑनलाइन शिक्षणासाठी (online education) करत होते. त्यामुळे हे लक्षात घेऊन कंपनीने 30 सप्टेंबरपर्यंत मीट अ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंग मोफत केले होते.

दरम्यान, जीसूट अंतर्गत 250 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतात, तर एक लाख लोक लाईव्ह पाहू शकतात. या व्यतिरिक्त मीटिंगचे रेकॉर्ड गुगल ड्राइव्हमध्ये देखील सेव्ह केले जाऊ शकते. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम ॲपवर युजर्संना 45 मिनिटांचा व्हिडिओ कॉलिंग करताय येते. Google Meet आता सर्व युजर्संना 60 मिनिटांचा ॲक्सेस देणार आहे.


Share this Newz