The Newz Biz Team, Pune
वंध्यत्व ही समस्या जगात सर्वत्रच आढळते. भारतात दर सहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता महिन्यागणिक घटत असते आणि नैसर्गिक मार्गाने अपत्यप्राप्ती करून घेण्याचा एक वर्ष प्रयत्न करून यश येत नाही, हे लक्षात आल्याबरोबर वंध्यत्वावर इलाज करणा-या तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणा-या महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता मोठी असते. सकारात्मक विचार करणा-या महिलेला तणावात वावरणा-या महिलेपेक्षा लवकर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. अलीकडेच झालेल्या पाहणीनुसार, ज्या महिलांच्या शरीरात अल्फा अमिलेज या एन्झाइम (रसायना) ची पातळी जास्त असेल, त्यांना गर्भवती होणे अवघड जाते, असे ओऍसिस फर्टिलिटीच्या सह -संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा राव यांनी म्हटले आहे.
आधीच तणावाखाली असलेल्या महिलांच्या मनात कोव्हिडच्या या वातावरणात इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार करून घेण्याबद्दल असलेली भीती लक्षात घेऊन आम्ही अशा महिलांना त्यांच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार उपलब्ध करून देण्याची विशेष संकल्पना मांडली आहे, असेही डॉ. दुर्गा राव पुढे म्हणाल्या.
ओऍसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉ. निलेश बलकवडे म्हणाले, ही एक दूरदृष्टीने मांडलेली अभिनव विचारसरणी आणि उपचारपद्धती आहे. यात मातृत्वाचे स्वप्न स्वतः च्या घराच्या सुरक्षित आणि तणावरहित वातावरणात राहून पूर्ण करण्याची संधी महिलांना मिळते. मात्र, इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार हॉस्पिटल व्यतिरिक्त अन्य ठिकाणी करताना आम्ही यासंबंधीचे नियम कुठेही मोडले जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. ‘वंध्यत्वावर तुमच्या घरीच उपचार’ या संकल्पनेमुळे असे उपचार घेऊ इच्छिणा-या परंतु कोविडच्या वातावरणात त्याबद्दल धास्ती घेतलेल्या हजारो विनापत्य दाम्पत्याच्या चेह-यांवर स्मित उमलेल हे नक्की. मात्र उद्दीपन, रुग्णाची देखरेख, इंजेक्शन अशा प्रक्रिया घरी होत असल्या तरी बीजांड स्वीकृतीसाठी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात यावे लागेल हे मी स्पष्ट करू इच्छितो.”
ओऍसिस फर्टिलिटी चे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक किरण गाडेला म्हणाले, ओऍसिस फर्टिलिटी दवाखान्यात सर्वोत्कृष्ट उपचार उपलब्ध करणे आणि नवीन कल्पना विकसित करणे याबाबतीत नेहमीच पुढे असते. कोव्हिडच्या या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्ही प्रभावी कार्यपद्धतींचा अवलंब करीत आहोत, कारण आमच्या पेशंट्सची सुरक्षितता आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही सुरु केलेल्या या आयव्हीएफ @होम उपचार पद्धतीमुळे पेशंटला स्वतःच्या घरात राहून वंध्यत्वावर उपचार घेणे शक्य झाले आहे.
असे उपचार घेणा-या व्यक्तीसाठी एक नर्सिंग मॅनेजर नियुक्त केला जाईल आणि सर्व उपचारांचा समन्वय तो करील. तज्ज्ञ डॉक्टर व्हर्च्युअल पद्धतीने रुग्णाच्या प्रकृतीची देखरेख करतील. प्रत्यक्ष औषधे / इंजेक्शन देणे तसेच आवश्यक त्या नोंदी करणे यासाठी एक परिचारिका रुग्णाच्या घरीच नियुक्त केली जाईल.
या उपचारपद्धतीची काही ठळक वैशिष्ट्ये :
• रुग्णाच्या घरात तणावरहित वातावरणात उपचार
• स्पर्शरहित उपचार
• क्लिनिकमध्ये वारंवार येण्याची आवश्यकता नाही
• व्हाइट ग्लव्हज सेवा
• खास नर्सिंग मॅनेजर
• व्हर्च्युअल पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
• पूर्ण गुप्तता
• रुग्णाच्या गरजेनुसार उपचार (Customized)
• लवचिकता
ओऍसिस विषयी :
सद्गुरू हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचा सदस्य असलेल्या ओऍसिस फर्टिलिटीने वंध्यत्वावरील उपचारांच्या संदर्भात जगभरात अवलंबिलेल्या कार्यपद्धती अनुसरत अपत्यप्राप्तीविषयक सेवाशुश्रुषेच्या बाबतीत नवे मापदंड निर्माण केले आहेत. येथे तपासण्या, सल्ला आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. स्थापनेच्या वर्षांपासून (२००९) ओऍसिस फर्टिलिटीने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुभव घेतलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली उत्तम यश संपादन केले आहे. आता ओऍसिस फर्टिलिटीने आंध्र, तेलंगण, तमिळनाडू, गुजरात, वडोदरा आणि महाराष्ट्र मिळून १२ केंद्रे सुरु केली आहेत.









Leave a Review