The Newz Biz Team, पुणे :
आजचा तरूण वर्ग लग्नाचा निर्णय स्वत:हून घेण्यास पसंती देत आहे. जवळपास 76 टक्के तरूण स्वत: आपली मॅट्रिमोनी प्रोफाइल तयार करतात, तर फ़क्त 7 टक्के पालक किंवा त्यांची भावंडे त्यांच्याकरता प्रोफाइल बनवतात. आश्चर्य म्हणजे 55 टक्के महिला आणि 61 टक्के पुरूष आपल्या जाती बाहेरील जोडीदार बघण्यास तयार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
भारत मॅट्रीमोनीचा एक भाग असलेली मराठी मॅट्रिमोनी ही मराठी तरूणांचे लग्न जुळवणारी एक संस्था आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी आपल्या लाखो नोंदणीकृत युझर्सचा एक रचनात्मक अभ्यास केला. या माहितीवरून मराठी तरूण वर्गाच्या कल्पना आणि लग्न जुळवताना आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या असलेल्या अपेक्षांबद्दल माहिती हाती आली आहे.
संशोधन अहवालातील महत्त्वाची माहिती:
- या युझर बेसमध्ये 30% महिला तर 70% पुरूषांचा समावेश होता.
- आजचा तरूण वर्ग लग्नाचा निर्णय स्वत:हून घेण्यास पसंती देतो, कारण या अहवालात असे लक्षात आले आहे की 76% तरूण स्वत: आपला मॅट्रिमोनी प्रोफ़ाइल तयार करतात, तर फ़क्त 7% पालक किंवा त्यांची भावंड त्यांच्याकरता हा प्रोफ़ाइल बनवतात.
- आश्चर्य म्हणजे 55% महिला आणि 61% पुरूष आपल्या जाती बाहेरील जोडीदार बघण्यास तयार होते.
- काही तरूण/णी आपल्याकरता परदेशात देखील जोडीदार बघत होते ज्यात प्रामुख्याने युएसए, जर्मनी, कॅनडा आणि फ़्रान्सचा समावेश होता.
- 26% महिला आणि 7% पुरूष आपला जोडीदार उच्च पद्धवीधर असावा अशी अपेक्षा करतात.
- पुरूषांमध्ये व्यवसायिक दृष्ट्या “ उद्योगात निपूण आणि स्वत:चा व्यवसाय असणारे होते” तर त्या खालोखाल कार्यकारी आणि पर्यवेक्षकांची संख्या होती. महिला नोंदणीकृतांमध्ये, सॉफ़्टवेअरमध्ये कार्यकरणाऱ्या आणि त्या नंतर “कार्यकारी” पदावरील महिलांचा समावेश होता.
- सर्वाधिक नोंदण्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हे जे अग्रगण्य स्थानावर होते, ते म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अहमदनगर. राज्याच्या बाहेर राहणाऱ्या मराठी तरूणांमध्ये सर्वाधिक नोंदणी ही बेंगलूरू, बेळगाव, हैद्राबाद आणि वडोदरा येथून होती.
याबाबत बोलताना, मॅट्रीमोनी.कॉमचे संस्थापक आणि सीईओ मुरुगावेल जानकीरामन म्हणाले, गेल्या 20 वर्षात मराठी मॅट्रीमोनी ने लाखो मराठी भाषिकांची मने जिंकत जोडीदाराच्या निवड संस्थांमध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे. आम्ही आमचा युझर बेस मराठी समाजामध्ये जागतिक स्तरावर वाढवितो आहोत आणि त्यांना सर्वोत्तम अशी सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत.
Matrimony.com बद्दल थोडेसे
Matrimony.com ही भारतातील एक ग्राहकोपयोगी इंटरनेट कंपनी आहे. ग्राहक हे इंटरनेटचे वापरकर्ते असून, भारत मॅट्रीमोनी, कम्युनिटी मॅट्रीमोनी आणि एलिट मॅट्रीमोनी असे ब्रॅन्ड्स आहेत. भारतभरात 140 स्वत:ची आऊटलेट्स देखील आहेत. कंपनीद्वारे जोडीदार निवडणे आणि लग्नासंबंधित सेवा भारतासह, भारता बाहेरील भारतीयांकरिता प्रदान केल्या जातात. कंपनीद्वारे याशिवाय नवीन व्यवसायिक मॉडेल्स जसे MatrimonyBazaar.com, Mandap.com आणि CommunityMatrimony.com, देखील सुरू करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे सुमारे 300 सामाजिक मॅट्रिमोनी संकेतस्थळांचा एक समूह निर्माण झाला आहे.







Leave a Review