Tata sky : टाटा स्कायच्या स्मार्ट सेट-टॉप बॉक्सच्या किमती आणखी कमी

टाटा स्काय बिंज प्लस आता नव्या ग्राहकांसाठी २९९९ च्या आकर्षक किमतीत उपलब्ध
Share this Newz

पुणे : ग्राहकांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देत टाटा स्कायने आपल्या टाटा स्काय बिंज प्लस या अँड्रॉईड टीव्ही समर्थित स्मार्ट सेटटॉप बॉक्सच्या किमती आणखी कमी केल्या आहेतटेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिल्या जाणाऱ्या डीटीएच आणि ओटीटी कंटेंटच्या क्षमतांना एकत्रित बळकटी देत हे नव्या युगातील उपकरण आता नव्या सबस्क्राइबर्ससाठी  २९९९ रुपये आणि आधीपासूनच्या सबस्काईबर्ससाठी २४९९ रुपये अशा स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहेजुन्या सबस्क्राइबर्सना आधीचा सेटटॉप बॉक्स अपग्रेड करता येईल किंवा दुसरे मल्टि टीव्ही कनेक्शन घेता येईल.

टाटा स्काय बिंज प्लस  सेटटॉप बॉक्ससह कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना टाटा स्काय बिंज सबस्क्रीप्शनचा भाग म्हणून सहा महिन्यांसाठी आठ ओटीटी अॅप्सवरील प्रीमिअम कंटेंट उपलब्ध होतोयात  डिस्ने  हॉटस्टार प्रीमिअम, झी५वूट सिलेक्टवूट किड्ससननेक्स्टहंगामा प्ले, ईरॉस नाऊ आणि शेमारूमी यांचा समावेश आहे 

या ऑफरबद्दल टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल अॅण्ड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, कंटेंट वापरात एक नवा ट्रेंड सध्या दिसून येतोग्राहकांना नेहमीच्या टीव्हीसोबत ओटीटी कंटेंटही एकाच एकात्मिक व्यासपीठावर पहायचा आहेअँड्रॉईड समर्थित टाटा स्काय बिंज प्लस  गुगल असिस्टंटवर आधारित व्हॉईस सर्चलाही साजेसा आहेयात गुगल प्ले स्टोअर वापरता येते आणि यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय काही सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या प्रीमिअम ओटीटी अॅप्सचे सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळतेया सर्व मुद्द्यांमुळे कंटेंट पाहण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरतोगेल्या काही महिन्यांत सबस्क्रिप्शनमध्ये सकारात्मक वाढ झाल्याचे आम्ही अनुभवत आहोतआता उत्सवांचा काळ समीप येत असताना आम्ही ग्राहकांना अधिक आनंद देण्यासाठी टाटा स्काय बिंज प्लस  स्मार्ट सेट टॉप बॉक्स कनेक्शन आणि विविध अॅप्स अत्यंत आकर्षक किमतीत देण्याचा निर्णय घेतला आहे.


Share this Newz