‘गाव तिथे ग्रंथालय’साठी युवकांचा प्रयत्न; जुनी-नवी पुस्तके दान करण्याचे आवाहन

'युवकमित्र परिवार'नंदूरबार चळवळीचा उपक्रम
Share this Newz

पुणे : राज्यात वाचन चळवळ राबवविणाऱ्या ‘युवकमित्र परिवार’नंदूरबार या चळवळीमार्फत पुणे शहरात जुने-नवे ग्रंथ संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी वाचून झालेले जुने, नवे ग्रंथ दान करावेत, असे आवाहन युवकमित्र परिवार’नंदूरबार चळवळीचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी केले आहे.

पुणे शहरातील ग्रंथदान करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी 9529125396 या क्रमांकावर संपर्क करावा. चळवळीचे स्वयंसेवक स्वतः येऊन ग्रंथ संकलित करतील, असे प्रवीण महाजन यांनी सांगितले.

युवकमित्र परिवार, नंदूरबार मार्फत राज्यातील ग्रामीण भागात वाचनालये स्थापन केली जातात. या वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट दिले जातात. यासाठी पुणे शहरात ‘सेवा सप्ताह, दान सप्ताह, वाचन प्रेरणा दिनाच्या धर्तीवर ‘ग्रंथ संकलन मोहीम’ राबविण्यात येत आहे. नागरिकांनी दान केलेले जुने/नवे ग्रंथ ग्रामीण, दुर्गम भागातील वाचनालयांना प्रदान केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथ संकलन मोहिमेत सहभागी नोंदवावा असे आवाहन चळवळीचे कार्यकर्त सागर पाटील,चेतन मराठे, राम जवान, गणेश माळी, मनोज वारुडे यांनी केले आहे.


Share this Newz