मुंबई : लॉकडाऊन दरम्यान उघडकीस येत असलेली एटीएम फसवणूकीची प्रकरणे लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी आधारित एटीएम’मधून रोख पैसे काढण्याची सुविधा 24 × 7 लागू केली आहे.
यापुढे एसबीआयच्या एटीएम’मधून १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढल्यास दिवसादेखील ओटीपी लागेल. १ जानेवारीपासून बँकेने नवीन नियम लागू केला. त्याअंतर्गत १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढताना ओटीपी आधारित रोख रक्कम रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत लागू करण्यात आला होता.
आता तुम्ही १० हजार किंवा त्याहून अधिक पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेलात, तर आता तुमच्याकडे कार्ड प्रविष्ट करुन रक्कम जमा केल्यावर बँकेत नोंदवलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे, हा ओटीपी डेबिट कार्डच्या पिनसह प्रविष्ट करावा लागेल, तरच आपण एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहे.
एसबीआय नेहमीच तंत्रज्ञानात सुधारणा आणि सुरक्षेच्या बाबतीत अग्रणी आहे. आम्हाला खात्री आहे की, 24×7 ओटीपी-आधारित पैसे काढण्याचे वैशिष्ट्य सुरक्षिततेची पातळी आणखी मजबूत करेल. दिवसभर या सुविधेची अंमलबजावणी केल्यास एसबीआय डेबिट कार्डधारक फसवणूक, अनधिकृत पैसे काढणे, कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आणि तत्सम जोखीम टाळण्यास सक्षम असतील.
एसबीआय एमडी (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस शेट्टी







Leave a Review