नवउद्योजक तयार करण्यासाठी ट्रान्स ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर स्थापन

Share this Newz

मुंबई : नवी मुंबईत नुकतेच राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे उद्योजक एकत्र येऊन नवउद्योजक तयार करण्यासाठी ट्रान्स ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर (Transglobal Entrepreneurs Chamber of Commerce for Industry and Agriculture) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या सी.ई.ओ. पदी चंद्रकांत जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संस्थेच्या स्थापनेसाठी चंद्रकांत जगताप यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विविध नामवंत उद्योजकांना एकत्र करून खास करून ज्यांनी शून्यातून आपला उद्योग निर्माण केला आहे, अशा सर्व धाडसी व्यक्तींना एकत्र घेऊन या संस्थेची निर्मिती केलेली आहे.

ट्रान्सग्लोबल आंत्रप्रेनर चेंबर आँफ काँमर्स अँन्ड ऍग्रीकल्चर चेंबरच्या माध्यमातून तळागाळातील, खेडोपाड्यातील व्यक्तीलाही व्यवसाईक उद्योजक बनवणार असून, स्किल आणि अनस्किल क्षेत्रातील संधी निर्माण करण्यासाठी युवकाना मान्यवरांच्या माध्यमातून संधी उपल्बध करून देण्यात येणार आहेत. या शिवाय शासनाच्या विविध योजनांचा उपयोग सर्व स्तरावरील युवक-युवतीसाठी करण्यात येणार आहे.

चेंबरच्या स्किल आणि अनस्किल विभागाची जबाबदारी किरण राणे यांच्याकडे दिली असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वुमन्स इम्पाँवरमेंट विभागाच्या प्रमुखपदी मंजुषा परब आणि प्रतिका घेवडेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. चेंबरच्या उपाध्यक्षपदी मंजुषा परब यांची निवड करण्यात आली आहे.

गावपातळीपासून तालुका, जिल्हा, राज्य अशा स्तरावर चेंबरचे काम नियोजनबध्द चालणार असून, यावेळी मेगा इंजनिअंरिगचे चेअरमन निलकंट वाघमारे यांची पुणे चॅप्टरच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. चेंबरचे सरचिटणीस संतोष गायकवाड आणि उदय खरात असून, चेंबरच्या खजिनदारपदी संदेश उघडे हे आहेत.

युवकांना जोडण्यासाठी तरूण उद्योजक रोहन साळुंखे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात सर्व स्तरावर चेंबरचे काम चालेल, असा विश्वास चेंबरचे संस्थापक अध्यक्ष आणि चीफ मँनेजींग डायरेक्टर चंद्रकांत जगताप यांनीनी व्यक्त केला.


Share this Newz