- पुण्यातील उत्पादक ब्लूमार्क प्रमोशन्स’चे नवे फेस शिल्ड- स्मार्टगार्ड बनले कोव्हिड-१९ विरोधात देशातील पहिल्या पसंतीचे सुरक्षा कवच
पुणे : कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या भारतात वाढत असताना, दर्जेदार संरक्षणात्मक उपकरणांची मागणीही वाढत आहे. पुण्यातील ब्लूमार्क प्रमोशन्सने कोव्हिड कम्फर्ट या त्यांच्या ब्रँड अंतर्गत स्मार्टगार्ड फेस शील्डच्या उत्पादनासाठी डॉक्टर, अभियंता आणि उत्पादन डिझायनर्सचा समावेश असलेला एक संशोधन व विकास समूह एकत्र केला आहे.
एका महिन्यातच, स्मार्टगार्ड फेस शील्डने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा प्रतिसाद मिळवला. सर्वसामान्यांना फेस मास्क घालण्यास कठीण व गैरसोयीचे वाटते. कारण यामुळे सहजपणे श्वास घेण्यास निर्बंध येतात. तसेच बोलतानाही अडथळा निर्माण होतो. फेस शील्ड, चांगले संरक्षण प्रदान करतात, पण ते खूपच नाजूक असतात किंवा दिवसभर वापरणाऱ्यांना खूप जड वाटतात. स्मार्टगार्ड लोकांसाठी उत्कृष्ट दर्जाची सुरक्षा आणि सोयी पुरवतो. लाँच झाल्यापासून महिनाभरातच भारतीय बाजारासोबतच विदेशातूनही याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या महिन्याच्या अखेरीस दैनंदिन उत्पादन क्षमता ५,००० पीसीवरून १०,००० पीसीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करीत आहोत, असे ब्लूमार्क प्रमोशन्सचे संस्थापक संचालक, सचिन लुनावत म्हणाले.
स्मार्टगार्डचे वजन फक्त १०० ग्रॅम असून, यूझरचा चेहरा पूर्णपणे झाकण्यासाठी हे डिझाइन केले आहे.
या शील्डमधील व्हिजर्स आणि फिल्टर्स बदलता येण्याजोगे असून, अशी सुविधा या श्रेणीत इतर उत्पादनांमध्ये उपलब्ध नाही. तसेच फॉगिंग किंवा व्हॉइस इकोशिवाय यूझर्सना आरामदायी वापराचा अनुभव प्रदान केला जातो.
सर्व आरोग्य कर्मचारी आणि सामान्य लोकांसाठी स्मार्टगार्ड पहिली पसंत बनली आहे. भारतीय बाजारासह सॅन फ्रान्सिस्को, इटली, कॅनडा, युएई, इक्वाडोर, नैरोबी आणि इतर देशांमध्येही निर्यात करणार आहोत. स्मार्टगार्ड आमच्या ‘कोव्हिड-कम्फर्ट’ या ब्रँडअंतर्गतच्या पेटंट उत्पादनांपैकी एक आहे, असे ब्लूमार्क प्रमोशन्सचे सीईओ यश लुनावत म्हणाले.
कोव्हिड कम्फर्ट स्मार्टगार्ड फेस शील्ड हे भारतातील सर्व मोठ्या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने ते अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या अग्रगण्य ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून दिले आहे. उत्पादनाची वाढती मागणी आणि साथीच्या आजाराशी लढताना संरक्षणात्मक उत्पादनांची निकड लक्षात घेता, ब्लूमार्क प्रमोशनने मागील महिन्यात त्याचे वितरण नेटवर्क मोठ्या गतीने वाढवले. वितरक होण्यास इच्छुक असलेली कोणतीही वितरक www.covidcomfort.in. या कंपनीच्या वेबसाइटवर संपर्क साधू शकतात.







Leave a Review