पण पंतप्रधान मोदींनी खेळण्यांवर चर्चा केली

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत निशाणा
Share this Newz

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधत करोना, शेतकरी, खेळणी उद्योग आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. पण जेईई व नीट या परीक्षांच्या संदर्भात काहीच भाष्य केले नाही. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी ‘परीक्षेवर चर्चा’ करावी असे ‘जेईई-नीट’च्या परीक्षार्थींना वाटत होते. मात्र, पंतप्रधानांनी केली ‘खेळण्यांवर चर्चा’.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केले.  

या अगोदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधतना, खेळणी उद्योगावर भाष्य केले. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आता सर्वांसाठी लोक खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्र सरकारला या अगोदर दिलेला आहे.

विविध राज्यांतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्य सरकारांनी नीट व जेईई परीक्षा घेण्यास विरोध केलेला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे.

 

Advertisement
Advertisement

Share this Newz