तांबडा रस्सा आणि ठेच्याच्या प्रॉन्सचा आस्वाद घेता येणार घरच्या घरी

घरच्या घरी मिळवा 'द ताज'  अनुभव आयएचसीएलचा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म क्युमिन आता पुण्यात
Share this Newz

पुणे :  मिस्टिक मसालामधून ठेच्याचा प्रॉन्स आणि तांबडा रस्सा, व्हिस्परिंग बांबूमधून चिकन कुंग पाव आणि लॅटिट्युडमधून सर्व खवय्यांच्या हमखास आवडीचा खिमा पावचा आस्वाद घरी बसून घेता येणार आहे. 

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (आयएचसीएल) क्युमिन हा गॉर्मे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आता पुणेकरांसाठी सुरू करण्यात आले आहे. क्युमिनच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणेकरांना स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी नावाजल्या जाणाऱ्या ब्ल्यू डायमंड, पुणे – आयएचसीएल सिलेक्शन्सच्या नामांकित रेस्टॉरंट्सच्या डिशेस आता घरपोच मिळू शकणार आहेत. मिस्टिक मसाला, व्हिस्परिंग बांबू आणि लॅटिट्युड या अतिशय वाखणल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट्समधून घरी जेवण ऑर्डर करता येईल.

क्युमिनच्या डिजिटल मेन्यूमध्ये मिस्टिक मसालामधून ठेच्याचा प्रॉन्स आणि तांबडा रस्सा, व्हिस्परिंग बांबूमधून चिकन कुंग पाव आणि लॅटिट्युडमधून सर्व खवय्यांच्या हमखास आवडीचा खिमा पाव यांचा समावेश आहे.

क्युमिनमुळे आधीच्या काळातील सुखद आठवणी, उच्च प्रतीचे खाद्यपदार्थ, अस्सल स्वाद आणि आपलीशी वाटणारी आतिथ्यशीलता यांचा अनुभव पुन्हा एकदा घेता येणार आहे.

खवय्यांना खाद्यपदार्थांच्या सुरक्षा आणि स्वच्छता यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.  संपर्क आणि स्पर्शाविना डिलिव्हरी, संपूर्णतः सॅनिटाइज्ड वाहने आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण प्रोटेक्टिव्ह गियर्सचा अनिवार्य वापर यांचा समावेश आहे. खाद्यपदार्थ पर्यावरणस्नेही आणि बायो-डिग्रेडेबल साहित्य वापरून पॅक केले जातात, संपूर्ण डिलिव्हरी प्रक्रियेमध्ये खाद्यपदार्थ सुरक्षित राहावेत आणि त्यांचा ताजेपणा टिकून राहावा, यासाठी विशेष तयार करण्यात आलेले इन्स्युलेशन बॉक्सेस वापरले जातात.

पुण्यामध्ये 1800 266 7646 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपल्या ऑर्डर्स नोंदवू शकता.

या नव्या सेवेबद्दल ब्ल्यू डायमंड, पुणे – आयएचसीएल सिलेक्शन्सचे जनरल मॅनेजर सुजू कृष्णन यांनी सांगितले, की ऑनलाईन जेवण, खाद्यपदार्थ मागवता यावेत, यासाठी ग्राहकांची मागणी सातत्याने वाढते आहे. आता घरबसल्या सुरक्षितपणे या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 

Advertisement
Advertisement

Share this Newz