लोकडाऊन काळात कॅरमला मागणी वाढली

Share this Newz

मुंबई :

दरवर्षी पावसाळ्यात फुटबॉलची प्रचंड मागणी वाढते. पण कोरोनाच्या साथीमुळे यंदा कुणीही फुटबॉल खरेदीसाठी येत नाही. मात्र सध्या घरगुती व्यायामाचे साहित्य खरेदी करण्यास लोक प्राधान्य देतात. याचप्रमाणे घरात अडकलेल्या नागरिकांकडून कॅरमची मागणी तर प्रचंड वाढली आहे.

कोणत्याही दुकानातून दिवसाला 10-12 कॅरम संपायचे. त्यामुळे साठा संपल्याचा प्रत्यय येत आहे.

श्वास घ्यायला त्रास होईल म्हणून संपर्काचे खेळ मुखपट्टी लावून खेळताच येणार नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध रोखू शकेल, अशा क्रीडा साहित्याची निर्मिती होणे कठीण आहे.

टेनिस, बॅडमिंटन यांच्यासारख्या खेळांना सद्य:स्थितीत फारशी समस्या येणार नाही. त्यामुळे काही खेळांना परवानगीही देण्यात आली आहे. कारण तिथे सुरक्षित अंतर मुळातच पाळले जाते. फुटबॉल खेळणे धोकादायक असल्याचे म्हटले जात होते. परंतु परदेशात सर्वच लीग सुरू आहेत.


Share this Newz