यूईएफए चॅम्पिअन लीग (UEFA Champions League ) स्पर्धेत बार्सिलोना क्लबने नापोलीवर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. या उत्कृष्ट अशा विजयानंतर बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ही उपांत्य फेरी गाठल्यानंतर त्यांचा पुढील सामना बायर्न म्युनिचशी होणार आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यानंतर ४-२ अशा अग्रीगेट लीडच्या बळावर बार्सिलोनाने विजय मिळवला आहे. लियोनल मेस्सीच्या गोलच्या मदतीने बार्सिलोना क्लबने नापोलीला ३-१ ने धूळ चारली.
बार्सिलोनाच्या क्लेमेंट लेंग्लेटने पहिला गोल १०व्या मिनिटाला केला. त्यानंतर २३व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल करत २-० ची आघाडी घेतली. त्यानंतर पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत पहिल्या मिनिटाला लुइस सुआरेझने बार्सिलोनाला तिसरा गोल मिळवून दिला. तर पाचव्या मिनिटात लोरेन्झो इन्साइने गोल केला.
बार्सिलोना-नापोली सामन्यात सारे गोल पूर्वार्धातच झाले. मात्र उत्तरार्धात एकही गोल होऊ शकला नाही. त्यामुळे बार्सिलोना क्लबचा विजय झाला आहे. दरम्यान, बायर्न म्युनिच आणि चेल्सीला यांच्यात झालेल्या सामन्यात बायर्न म्युनिच क्लबने चेल्सीला ४-१ ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता बार्सिलोना क्लबचा पुढील सामना हा बायर्न म्युनिचसोबत होणार आहे.









Leave a Review