विनियार्ड चर्च, दापोडी येथे ईस्टर संडे उत्साहात साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : दापोडीतील विनियार्ड वर्कर्स चर्च येथे इस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड व राज्यातून जवळपास दहा हजाराहून अधिक ख्रिस्ती बांधवांनी व नागरिकांनी चर्चमध्ये उपस्थिती लावली. यावेळी विनियार्ड वर्कर्स चर्चचे संस्थापक, पास्टर (डॉ) पीटर डेव्हिड सिल्वे आणि पास्टर (डॉ) जयश्री पीटर सिल्वे यांनी उपस्थिताना इंग्रजी आणि मराठी भाषेतून संदेश दिला. यावेळी प्रभु येशूच्या पुनरुत्थानाशी संबंधित तत्त्वे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कार्य करणारी देवाची शक्ती जी प्रत्येकाला एक चांगले जीवन आणि जगणे देते, ह्याचे ज्ञान अत्यंत सहजसोप्या पद्धतीने समजून सांगण्यात आले. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची शक्ती समजून घेण्यासाठी प्रथम प्रभू येशूला जाणले पाहिजे, अशी विशेष शिकवण पास्टर पीटर यांनी यावेळी सर्वांना दिली.
त्याचप्रमाणे तारणाच्या महान आशेचे सार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात आहे, असे सांगितले. या ईस्टर संडे पर्वाच्या वेळी व प्रभु येशू ख्रिस्ताचे जीवन बदलणारे पुनरुत्थान ऐकण्यासाठी सर्व स्तरातील व क्षेत्रातील लोक एकत्र आले होते.  संदेश कार्यक्रमानंतर सर्वांना प्रभूभोजन देण्यात आले. सेवेची सांगता प्रीती भोजनाने झाली.


Share this Newz