पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसचा दै. लोकमतने केला सन्मान

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी : लोकमतच्या वतीने ‘करिअर मंत्रा’ शैक्षणिक प्रदर्शन शनिवार व रविवारी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडले. या शैक्षणिक प्रदर्शनात पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसने पालक व विद्यार्थ्यांना क्लासमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, लोकमतच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत व प्रदर्शनातील सहभागाबद्दल जिनियस क्लासेसचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी, कासारवाडी या भागातील अल्पावधीत नावारूपाला आलेला क्लास म्हणून जिनियस क्लासेसने ओळख निर्माण केली आहे.
या क्लासेसमध्ये अनुभवी व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 5 वी ते 12 वी पर्यंतचे अध्यापन केले जाते.तसेच सायन्स ,कॉमर्स,जेईई ,नीट ,सीईटी प्रवेश परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने क्लासमध्ये गेस्ट लेक्चर्सचे आयोजन केले जाते.आतापर्यंत क्लासमधून 300 हुन आधिक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

सामान्य विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात कांही गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले असून उत्तम गुणवत्ता कायम ठेवून पालकांच्या व विद्यार्थ्यांचा विश्वासास पात्र राहू .

-तेजस्विनी मासाळ, संचालिका, जिनियस क्लासेस, पिंपळे गुरव


Share this Newz