सांगवी काळेवाडी मंडल, भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा सुषमा स्वराज महिला पुरस्काराने गौरव

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी : सांगवी-काळेवाडी मंडल, भाजपा महिला मोर्चाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना सुषमा स्वराज महिला सन्मानाने गौरविण्यात आले. आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, सांगवी काळेवाडी मंडल भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली राहुल जवळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभाग 29 च्या अध्यक्षा राखी वाझानी, प्रभाग 31 च्या अध्यक्षा कोमल गौंडडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.      

योगशिक्षिका काकुमानू व्यंकट लावण्या यांना मोफत योग प्रशिक्षण, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, कष्टकरी महिलांना आर्थिक मदत, गरीब गरजू कुटुंबांना दवाखाण्यासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल, मिसेस पिल्ले यांना सामाजिक कार्याबद्दल, लेखिका विजया नागटिळक यांना मोफत पथनाटयाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केल्याबद्दल, डॉ. नीलिमा पटेल यांना जेष्ठ नागरिक तसेच गरीब गरजू रुग्णांना मोफत फिजिओथेरपी सेवा पुरविल्याबद्दल सुषमा स्वराज महिला सन्मानाने गौरविण्यात आले.


Share this Newz