अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पारंपरिक दागिन्यांच्या मागणीत वाढ

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर पारंपरिक दागिन्यावर अधिक भर दिला जातो. यंदाही पारंपरिक दागिने खरेदीवर भर दिला असून, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा चेहरा असलेले हिरे, मोती पाचू उपयोग करुन बनविलेल्या दागिन्याची मागणी वाढली आहे. आतापर्यंत जे कलेक्शन सादर केले त्यापैकी 80 टक्के कलेक्शन बुक झाले आहे, अशी माहिती एस.एस. नगरकर ज्वेलर्सचे संचालक प्रसाद नगरकर यांनी दिली. प्रथमच असा प्रयोग यांनी केला असून त्यास मागणाद्वारे यशही मिळत आहे. तसेच या कलेक्शन ची विक्री फक्त दोन महिन्यांसाठीच आहे.

सोन्याच्या दागिन्यामध्ये पारंपरिक आभूषणाची आवड असणार्‍यासाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तींच्या अध्यात्मिक कल्पना आणि रचना माथॉलॉजीवर प्रेरित होवून मुर्तीवरील कोरलेल्या पौराणिक छायचित्रांवर आधारित श्री रुक्मिणी कलेक्शन सुमारे सात वर्ष विविध छायाचित्रांचा आणि मंदीरांचा अभ्यास करुन सादर केले आहे. श्री रुक्मिणी कलेक्शनमध्ये पुतळीहार, मासोळ्या, बाजूबंद, मंगळसूत्र, लक्ष्मी हार, चंद्रहार राणीहार, विविध कंगन, झुमके नथ, नथनी इत्यादींचा समावेश असून पारंपारिक दागिन्याची आवड लक्षात घेऊन या दागिन्यांचे डिझाईन करण्यात आले आहे.
25 ग्रॅम पासून अडीचशे ग्रॅम पर्यंत ग्राहकांना उपलब्ध आहेत.


Share this Newz