प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :      पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

डॉ. घोरपडे प्राचार्य गटातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर भरघोस मतांनी विजयी झाले होते. डॉ घोरपडे हे पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. डॉ. घोरपडे यांना अध्यापनाचा सतरा वर्षे व प्राचार्य पदाचा पंधरा वर्षे अनुभव आहे. त्यांनी चार वेळा अभ्यास मंडळ सदस्य, दोन वेळा अध्यक्ष, दोन वेळा फॅकल्टी सदस्य, दोन वेळा आर आर समिती सदस्य, दोन वेळा विद्यापरिषद सदस्य, बीसीयुडी उपसमिती सदस्य अशा विद्यापीठ अधिकार मंडळावर विविध समित्यांवर काम केले आहे.

त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत बँकॉक,सिंगापूर, स्पेन, इराण, ओमन, बारसिलोना तसेच राष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांची चार संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांनी युजीसी लिस्टेड जर्नलस, प्री रिव्ह्यूव जर्नलस सेमीनार, वर्कशॉपसमध्ये शंभरहून अधिक शोध निबंध व सोळा पुस्तके प्रसिद्ध झाले आहेत. विविध विषयांवरील ५५ लेख वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ संशोधक विद्यार्थ्यांनी एम. फील. तर दहा विद्यार्थ्यांना पी. एच. डी. जाहीर झाली असून चार विध्यार्थी एम. फील. तर पाच विद्यार्थ्यां पी. एच. डी. संशोधन करत आहेत. त्यांना राष्ट्रीय सेवा योजना राज्य पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जी.बी.कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, करिअर कट्टा अंतर्गत उत्कृष्ट राज्यस्तरीय प्राचार्य व उत्कृष्ट विभागीय प्राचार्य पुरस्कार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा बाबुरावजी घोलप पुरस्कार प्राप्त असे मानाचे ३२ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांनी महाविद्यालयात अध्यापन, संशोधन व विस्तार कार्यासंबंधी अभिनव उपक्रम राबविले आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर विविध समित्यांवर काम केले आहे. त्यांचे विविध विषयांवरील संशोधनपर लेखन प्रसिद्ध झाले आहे.


या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व विधानसभा विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले. डॉ नितीन घोरपडे यांच्या बिनविरोध व्यवस्थापन परिषद निवडीसाठी समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आजीव सदस्य सुनेत्राताई पवार, लिज्जत पापड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कोते, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. प्रशांत साठे, विखे पाटील अध्यासनाचे समन्वयक डॉ. मुकुंद तापकीर, प्र-कुलगुरु डॉ संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ एम.जी चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ पराग काळकर, मानव्यविद्या अधिष्ठाता डॉ विजय खरे, आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ अधिष्ठाता डॉ दिपक माने, अर्थशास्त्र विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ विलास आढाव, पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अन्वर शेख, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य जगदीश कदम, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नियामक मंडळ सदस्य मा. संदीप जगधने, प्राचार्य डॉ नंदकुमार निकम, डॉ. संजय खरात, डॉ. सुधाकर जाधवर यांचा समावेश आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.


Share this Newz