पिंपळे गुरवमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा एकत्रित ‘होम टू होम’ प्रचार; नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत 

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ‘होम टू होम’ प्रचार सुरू केला असून, नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. ‘तुम्हीच आमचे आमदार’ अशा शब्दात नागरिक भावना व्यक्त करीत आहेत. 

प्रचारावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला आहे. यामुळे उमेदवार नाना काटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पिंपळे गुरवमधील प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजीभाऊ जवळकर, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, काँग्रेसचे संदेश नवले, शिवसेनेचे अमित सुवासे, विकास सकट, माजी नगरसेवक राजू लोखंडे, विष्णू शेळके, नितीन सोनवणे, राजेंद्र रणशिंग, साहिल रोकडे, माजी नगरसेविका चंदाताई राजू लोखंडे, तृप्तीताई तानाजीभाऊ जवळकर, अश्विनीताई शामभाऊ जगताप, माजी सभापती ओबीसी शहराध्यक्ष विजू लोखंडे, सामाजिक न्याय विभागाध्यक्ष संजय औसरमल तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पिंपळे गुरवच्या विविध भागांमध्ये झालेल्या गाठीभेटी आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून ‘तुम्हीच आमचे आमदार’ असे म्हणत औक्षण केले जात आहे. विविध गल्ली व रस्त्यांवरून पायी चालत नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत पदाधिकारी आपुलकीने विचारपूस करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक, मतदार आणि माता भगींनींकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचाराच्या उत्साहात भरच पडत आहे. प्रचारादरम्यान ‘राष्ट्रवादी पुन्हा’चीच प्रचिती आल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत आहे. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक मतदार आणि घरापर्यंत पोहोचत पदयात्रेद्वारे मतदारांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.


Share this Newz