भव्य रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन अश्विनी जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी भव्य रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या भव्य रॅलीत माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Share this Newz