द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी यात्रेमधील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पवनाथडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या पवनाथडीमधील बचत गटातील स्टॉलला राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सदिच्छा भेट देऊन सहभागी बचत गटातील महिलांशी चर्चा केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी स्वी. नगरसेवक शिवाजी पाडुळे, प्रदीप गायकवाड, संदीप राठोड, उदय ववले, सचिन शेलार, राजेंद्र रणसिंग, नितीन सोनावणे, प्रा. महादेव रोकडे, सतीश चोरमले, शैलेश दिवेकर, तसेच पिंपळे गुरव, नवी सांगवी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Review