महेश मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :    दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळातर्फे चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ २६ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १७९ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तसंकलनसाठी आधार रक्त पेढी व इंडियन सेरॉलॉजिकल रक्तपेढीने सहकार्य केले. 
            पिंपळे गुरव येथील निळू फुले  नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये आयोजित या रक्तदान शिबिराला लीलाबाई गुगळे , संदीप गुगळे, मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, मनोज अटळ, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, मुकुंद तापडिया , गणेश चरखा, दीपेश मालानी, हेमंत पलोड, शुभम बिर्ला यांनी सहकार्य केले.

Share this Newz