द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : सांगवीतील डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी आयोजित भोंडल्यामध्ये महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक भोंडल्याची गाणी व नृत्याचा आनंद घेतला.
यावेळी उपस्थित महिलांनी गायन, कविता वाचन, नृत्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरणही केले. तसेच वेगवेगळ्या दांडिया गरबाच्या ग्रुपने खिरापत बनवून आणली होती व ती खिरापत ओळखण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. अशा प्रकारचे उपक्रम व्हायला हवेत, जेणेकरून महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. तसेच त्यांना एक व्यासपीठ हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल सर्व सहभागी महिलांनी भंडलकर यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डोनेट एड सोसायटीच्या संगीता प्रधान,ऋतुजा धर्माधिकारी, कांचन खरात, मयुरा खटके,आम्रपाली बनसोडे,ममता गायकवाड शोभा बलभीम माने,शीतल शिलवंत,चैत्राली कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सारिका कृष्णा भंडलकर यांनी मानले.
Leave a Review