द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : पिंपळे गुरव येथील माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्यावतीने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 41 (जुना प्रभाग क्रमांक 29)मधील ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस साजरा व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले असून, याचे उद्घाटन उद्योजक विजूशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
काशीद पार्क येथे झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके काका, तसेच ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला सभासदांनी केले होते. या कार्यक्रमात पांडुरंग भोसले, अनंत वराडे, मंगलताई, शैलेश मडकी, आशा जाधव, सीमा सिनकर, विमलताई आदी ज्येष्ठ नागरिकांचा रोपटे व शाल, श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक सागर आंघोळकर, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, नरेश जगताप, रमेश काशीद, मधुकर रणपिसे महाराज, दीपक जवळकर, निलेश जवळकर, अनिसभाई पठाण, रमेश गाढवे, आशिष जाधव, सुभाषदादा जाधव, ताहीरभाई शेख, राजाभाऊ साळुंखे, सुनीलभाऊ बांबळे, अशोक पाटील, राजू लोखंडे, शांताराम पिंजन, बलजीत आदियाल, शेरू सिंग, विकास चव्हाण, राजू गायकवाड, एन डी पाटील, राहुल काकडे, राजेश नितनवरे, युवा नेते अमरसिंग आदियाल, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला सभासद आदी उपस्थित होते.
उद्योजक विजूशेठ जगताप यावेळी बोलताना म्हणाले, की निसर्ग थांबत नाही. प्रत्येकाला ज्येष्ठ व्हायचेच आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठांसाठी आनंद निर्मिती झाली पाहिजे. यादृष्टीने नागरिकांसाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे स्तुत्य आहे.
माजी नगरसेविका शोभाताई आदियाल म्हणाल्या, की वाचन करता करता ज्येष्ठ नागरिकांना आपली सुख-दुःखे मांडता यावीत, या उद्देशाने या वाचनालयाची सुरुवात केली आहे. ज्येष्ठाना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
श्रीकृष्ण फिरके काका म्हणाले, की वाढदिवस साजरा करून ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात भर घातली आहे. तसेच वाचनालयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा केंद्र मिळाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी, तर युवा नेते अमरसिंग आदियाल यांनी आभार मानले.
Leave a Review