श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :      संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत दिल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे “वारकरी सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरात पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करतेवेळी हा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, ह.भ.प. मारुती कोकाटे, राजाभाऊ थोरात, धनंजय बडदे, बाळासाहेब वांजळे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना वारकरी सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

अरुण पवार यांच्यामार्फत आळंदी घाट परिसर, मोरया गोसावी मंदिर परिसर व घाट, श्री क्षेत्र साई देवस्थान शिरगाव, श्री क्षेत्र देहू गाव व इंद्रायणी घाट परिसर, पिंपळे गुरव, सिंहगड किल्ला आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले; झोपडपट्टी परिसरातील भटक्या / निराधार / शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वस्तीशाळा उपक्रम, एवढ्यावरच न थांबता कित्येक वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांना टँकरद्वारे मोफत पाणी वाटप, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना 5000 पाणी बाटल्यांचे वाटप, जेष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, झाडांसाठी मागेल त्याला मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून त्याच खर्चातून मोफत वृक्षांची रोपे वाटप, दुष्काळग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा, पशुधन व वन्यजीव वाचवा मोहिम, एक मुठ धान्य वन्यप्राण्यांसाठी, जनजागृती अभियान, पिंपळे गुरव परिसरातील महिलांना मोफत डस्टबीन वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, पर्यावरणपूरक मोफत कापडी पिशव्या वाटप, लोकांना पाणी पिण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोईंची स्थापना,

अनाथ, निराधार लोकांना कपडे-स्वेटर – ब्लँकेट, फळे वाटप, कष्टकरी, गोरगरीब झाडूकाम करणाऱ्या कामगारांना दिवाळी फराळ व भेटवस्तू वाटप, पोस्ट कर्मचाऱ्यांना गणवेश व भेटवस्तूंचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर व तुळजापूर दर्शन यात्रा, मोफत साहसी बालसंस्कार शिबीरांचे आयोजन, अंध – अपंगाना आर्थिक मदत व त्यांच्या संस्थाना वस्तूरूपी मदत, पोलिस ठाण्यांना बॅरीगेट व चहामशीन वाटप, माळीण दुर्घटनाग्रस्त कुटूंबांना आर्थिक मदत, १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार, युध्दात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, मोफत शिलाई मशीन वाटप , असे एक ना अनेक समाजपयोगी उपक्रम अरूण पवार निःस्वार्थीपणे व अविरत राबवत आहेत. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत विविध संस्थांच्या वतीने वृक्षमित्र अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे.


Share this Newz