डॉक्टर्स डे निमित्त घोलप महाविद्यालयातर्फे डॉक्टरांच्या कार्याला सलाम

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :     राष्ट्रीय डॉक्टर्स डे दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे निलख येथील सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सत्कार करत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालत व अविरत समाजसेवेचा ध्यास घेत डॉक्टरांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल कौतुक करत डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.
पिंपळे निलख सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार यांनी पल्स पोलिओ लसीकरण अभियान, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, एड्स जनजागृती अभियान अशा विविध उपक्रमामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक घेत असलेल्या सहभागाबद्दल त्यांना शाबासकीची थाप दिली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सुदर्शन गिराम, अनिकेत जाधव, ओमकार भोसले यांच्याबरोबर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


Share this Newz