डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान पहाटेच्या भीम बुद्ध गीतांनी धम्ममय 

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :   बुद्ध पोर्णिमेनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे यांचे संयुक्तपणे धम्मपहाट या भीम बुध्द गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या मधूमीत निर्मित रजनीगंधा कार्यक्रमात गायक मधुसुदन ओझा, स्वप्नील पवार, शीतल धूत यांनी एकाहून एक सरस भीम बुद्ध गीते गात बुद्ध पौर्णिमेची पहाट बुद्धमय केली.

‘वंदन गीत’, ‘विश्व तारण्या माहामानव बुद्ध आले जन्मास’, ‘पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे’, ‘रक्तपात हा नको मानवा /वाणी ऐकावी बुद्धाची’, ‘चांदण्याची छाया’, ‘भीमसूर्य क्रांतीचा’, ‘मनगटात शिवाजी डोक्यात भीम हवा’, ‘रमाई माझी होती वाघीण’, ‘संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार’, ‘खातो तो घास घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे’, अशा एकाहून एक सरस भीम बुद्ध गीतांनी अगदी पहाटे रसिक तृप्त झाले. या सर्वच गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे तथागतांच्या पूजनाने झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास ॲड. रंजनाताई भोसले यांनी, तर माता रमाईच्या पुतळ्यास मधुसुदन ओझा यांनी पुष्पहार अर्पण केले. बौध्दाचार्य वसंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड.‌ रंजनाताई भोसले, विलास काळोखे, शैलजा काळोखे, मयूर भरड, डॉ. मिलिंद निकम, संग्राम जगताप, हरिश्चंद्र गडसिंग आदी उपस्थित होते.

सुरेश धोत्रे यांनी दरवर्षी बौध्द पोर्णिमेच्या धम्मपहाट कार्यक्रमाचे नियोजन करण्यात नाट्य परिषदेचा सहभाग राहील, असे आश्वासन दिले.
सुत्रसंचालन एल. डी. कांबळे यांनी, तर आभार ॲड.‌रंजनाताई भोसले यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मारक समितीचे सचिव किसनराव थूल, संचालक तुकाराम मोरे,देवानंद बनसोडे, संजयजी गायकवाड,भागवतजी बि-हाडे,गंगाधर सोनवणे,रूपेश घोडेस्वार, आशिष कक्षीरसागर व इतर सदस्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी ओव्हाळ यांच्यावतीने खीर दान करण्यात आले.


Share this Newz