महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करा : अण्णा जोगदंड

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : कंत्राटी कामगारांना पण कामगार कायद्यानुसार सुविधा मिळणे गरजेचे आहे, परंतु त्यांना सर्व सुविधा आस्थापना मिळूत देत नाहीत. केंद्राने कायम कामगार संकल्पना मोडीत काढली आहे, उद्योग धार्जिने कायदे केंद्राने तयार केले आहेत. अनेक उद्योजक व व्यवस्थापन कंत्राटी कामगारांवर अन्याय करत आहेत आणि कंत्राटी कामगार सहन करण्यापलीकडे काही करू शकत नाही, याची दखल घेऊन कंत्राटी कामगारासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन कंत्राटी कामगार कल्याण मंडळाची स्वतंत्र स्थापना करावी. कामगाराचे वेतन इतर आपस्थापनेला न देता स्वतःकडे मंडळाकडे घेऊन त्यांना भविष्य निर्वाह निधी, ई.एस .आय. सी इत्यादी सेवा आपल्या मंडळामार्फत पुरवाव्यात.

अनेक वर्षापासून बांधकाम मजुरांना देण्यात येणारी पाच हजार रुपयाची साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान योजना राज्य शासनाने पुर्वी राबविली होती आता बंद झाली आहे. आपण याची दखल घेऊन पूर्वीची योजना पूर्ववत चालू करून कंत्राटी कामगाराचे  होणारे आर्थिक व माणसिक शोसन थांबवावे या मागणीसाठी आण्णा जोगदंड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि महाराष्ट्र राज्य कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांना यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

यावेळी या निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, शहर महिला अध्यक्षा संजना करांजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, आळंदी शहर सचिव रवी भेंकी, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Share this Newz