टाळेबंदीत एयरटेल, वोडाफोन-आयडियाचे युजर्स घटले

Share this Newz

मुंबई, प्रतिनिधी :   भारती एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाला युजर्सच्या बाबतीत मोठे नुकसान झाले आहे. एयरटेलने जवळपास ५२.६ लाख युजर्स गमावले असून वोडाफोन-आयडियाचे ४५.१ लाख युजर्स कमी झाले आहेत. अशाप्रकारे दोन्ही कंपन्यांना जवळपास १ कोटी युजर्स कमी झाल्याचा फटका बसला आहे. या दरम्यान रिलायन्स जिओला फायदा झाला असून त्यांचे युजर्स वाढले आहेत.         मार्केट लीडर असलेल्या रिलायन्स जिओने मार्केटची स्थिती बिघडलेली असतानाही १५.७ लाखांहून अधिक नवे युजर्स जोडले आहेत. मार्च २०२० मध्ये जिओला जवळपास ४७ लाख नवीन युजर्स मिळाले होते. तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओची कामगिरी चांगली आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या युजरबेसला धक्का लागलेला नाही.

वेगाने वाढत आहेत टेलिकॉम युजर्स

नवीन युजर्सशी संबंधित आकडेवारी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या वतीने शेअर करण्यात आले आहेत. तसं पाहता, एप्रिल २०२० मे टाळेबंदी सुरू असताना अधिक युजर्सला आपले मोबाइल कनेक्शन बंद करावे लागले होते, या युजर्समध्ये प्रवासी, मजूर आणि अन्य युजर्स यांचा समावेश होऊ शकतो. एप्रिलमध्ये नवीन भारतीय टेलिकॉम युजर्स ८० लाखांहून अधिक वाढले आहेत आणि यानंतरही नवीन युजर्सची सतत भरच पडत आहे अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरीने दिली आहे.

टेरिफ प्लान्स महागण्याची शक्यता

एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया लिमिटेडचे युजर्सच्या संख्येत ३२.२ कोटींची घट झाली असून ती संख्या ३१.४ कोटी झाली आहे. जिओचा युजर बेस एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या वाढीनंतर ३८.९ कोटी झाला आहे. मार्केटची सद्य परिस्थिती पाहता असं मानलं जात आहे की, टेरिफ प्लान महागण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सर्वच कंपन्यांचे प्लान्स महागले होते.


Share this Newz